Home » ब्रेकिंग न्यूज » तहसिलच्या तरुण कर्मचाऱ्याचा अंत –

तहसिलच्या तरुण कर्मचाऱ्याचा अंत –

तहसिलच्या तरुण कर्मचाऱ्याचा अंत

डोंगरचा राजा / आँनलाईन

माजलगाव — तहसिल कार्यालयात नौकरीस असलेला अकाश (अक्षय) विजय खरात वय 20 रा खरात याचा रामफळ च्या झाडावरून पडून दुर्देवी अंत झाला.
आकाश विजय खरात हा मूळ मंगरूळ ता घनसावंगी जिल्हा जालना येथील असून माजलगाव तहसिल येथे तो कॉन्ट्रॅक्ट बेसवर पुरवठा विभागात कामाला होता तो त्याच्या आई सोबत माजलगाव येथे वास्तव्यास होता.काही वर्षांपूर्वी त्याच्या पित्याचे छत्र हरवले होते. तहसिल कार्यालयात पुरवठा विभागात कॉन्ट्रॅक्ट बेसवर तो नौकरी करीत होता.आईला बस स्टँड वर सोडून तो तहसिल मध्ये आला दुपारी 3.30च्या दरम्यान तो तहसिल कार्यालयाच्या आवारात राम फळाचे झाड आहे या झाडावर चढला होता झाडावर वरून तोल जाऊन डोक्यावर पडल्याने मेंदूला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.त्यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु येथे त्यास मृत घोषित केले.ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसात आकस्मिक मृत्यू ची नोंद करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published.