Home » माझा बीड जिल्हा » घराणेशाहीमुळेच लोकशाही धोक्यात – अॅड.आंबेडकर

घराणेशाहीमुळेच लोकशाही धोक्यात – अॅड.आंबेडकर

घराणेशाहीमुळेचं लोकशाही धोक्यात – अॅड.आंबेडकर

डोंगरचा राजा / आँनलाईन

माजलगाव — घराणेशाहीमुळे लोकशाही धोक्यात आली आहे.त्या साठी आता वंचितांंचा वंचितपणा घालवण्याची हीच वेळ आहे अन्यथा हे प्रस्तापित बोकांडीवर बसतील त्यासाठीच घराणेशाहीला बाजूला सारुन वंचित आघाडीच्या उमेदवारास मत देऊन परिवर्तन घडवा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.
प्रकाश आंबेडकर यांनी माजलगाव येथे लोकसभेचे उमेदवार प्रा.विष्णू जाधव यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत दि.7 रविवार रोजी मोंढा मैदान येथे केले.या सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भगवान सरवदे यांनी वंचित आघाडीत प्रवेश केला.

यावेळी बीड लोकसभेचे उमेदवार प्रा.विष्णू जाधव ,एमआयएमचे जिल्हा अध्यक्ष शेख निजाम,अजिंक्य चांदणे,बहुजन समाज पार्टीचे प्रशांत वासनिक,विष्णू देवकते,रविकांत राठोड,डॉ.भगवान सरवदे,किसन चव्हाण,राजेश क्षीरसागर,धम्मानंद साळवे,शेख इंद्रिस पाशा अनिल डोंगरे,प्रशांत उघडे,यांच्यासह अन्य नेते उपस्थीत होते.पुढे बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते म्हणतात आम्ही सेक्युलर मग फडणवीस सरकारला पाठिंबा का दिला हे देखील जाहीर करावे.मुंह में राम और बगल में छूरी या सारखं राष्ट्रवादी कॉंग्रेस राजकारण करीत असल्याने या राजकीय हातखंडे वापरणाऱ्यांंपासून सावध रहा असे उपस्थितांना बोलतांना म्हणाले.देशाची नजर आणि सामजिक विश्लेषकांची नजर बीडवर आहे.आतापर्यंत लोकसभेची उमेदवारी ही कैकाडी समाजाला कोणत्याही राजकीय पक्षाने व कोणत्या पार्टीने दिली नसून ही पहिलीच वेळ असून ती उमेदवारी वंचित बहुजन आघाडीने दिल्याने समाजाच्या बदलास बुध्दीजीवींनी त्यास स्वीकारले पाहीजे हिचं सुशिक्षित वर्गाची खरी परीक्षा असेल.शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देवून पिढी घडवतात नवं शिक्षितांना घडवणाऱ्या वं.बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार प्राध्यापक विष्णू जाधव यांना प्रचंड बहू मताने विजयी करावे.देशात वंचित समाजाच्या उमेदवारला निवडणुकीत संधी द्यायचे मी सुरु केले आहे.या मुले अनेक पक्षाचे लोक मला भेटत आहेत व सांगत आहेत कि आम्ही त्यांच्या गाडीत जरी फिरत असलो तरी मतदान तुम्हालाच करणार,याचे कारण कि आमचा उमेदवार पडला तर,आमच्या पक्षात पण नवीन उमेदवाराचा शोध सुरु होईन तुम्ही सुरुवात करताय म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहेत.आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ज्या उमेदवाराची जातीचे मते जास्त त्यालाच उमेदवारी हा पायंडा आम्ही ह्या निवडणुकीत बंद करत आहोत.याचा उद्धेश असा आहे कि पक्षातील कार्यकर्त्याला उमेदवारी भेटली पाहिंजे.
मी चाळीस वर्षा राजकारणात असून मी कुणाला घाण राहिलो नाही.आजची इथली राजकारण्याची बांधिलकी हि इथल्या जात दांडग्या,धर्मवादि लोकांसोबत आहे.भांडवलदार लोकासोबत आहे.पण आम्ही वर्गणी गोळा करून निवडणूक लढत आहोत .तुम्ही जर विष्णू जाधव सारख्या उमेदवाराला निवडून दिले तर राजकारणाचा कायापालाट झाले असेल ,इथल्या राजकीय पक्षाला जनतेशी बांधिलकी ठेवावी लागेल .

आपल्याला वंचिताचा वंचित पण घालवायचा आहे,त्यामुळे आपल्याला हे यशस्वी करायचे आहे ,नाही तर ते परत आपल्या बोकांडीवर बसल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले.साध्वी ऋतुम्बरा देवी, साक्षी महाराजांनी दिलेली चीथावनिखोर वक्तव्य निट ऐका देशासोबतच इथली मानुसकी पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला व भाजपाला संपून टाकायची आहे.

आज आम्ही सेकुलर आहोत असे ओरडून सांगणारी राष्ट्रवादी कॉंग्रेस ला विचारा तुम्ही २०१४ च्या निवडणुकीत देवेंद्र फडवनिस सरकारला न माघता पाठींबा का दिला.का कोणते कारण होते.सरकार बनत नव्हते परत निवडणूक झाली असती तर कदाचित भाजपा सरकार बनले नसते.आता राष्ट्रवादीने सांगावा कि त्यांनी कशामुळे भाजपला पाठीन्म्बा दिला होता .असा जाब त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला विचारला.

यावेळी त्यांनी व्यापारी लोकांनां आवाहन केले की जसे शेतकरी लोक आत्महत्या करत आहेत तसेच आता व्यापारी लोक सुद्धा आत्महत्या करण्याच्या जवळ पोहोंचले आहेत.आणि ह्या संकटापासून वाचायचे असेल तर अर्थव्यवस्था परत सुरु झाली पाहिंजे आणि परत अर्थाव्यावस्था सुरु करण्यासाठी इथल्या व्यापारी लोकांनी मोदिला सत्तेपासून हटवले पाहिंजे,त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश निसरगंध यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.