Home » माझा बीड जिल्हा » खा.मुंडेंना मताधिक्क्याने विजयी करा- आ.धस

खा.मुंडेंना मताधिक्क्याने विजयी करा- आ.धस

खा.मुंडेंना मताधिक्क्याने विजयी करा- आ.धस

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

पाटोदा — बीड ज़िल्ल्याच्या विकासासाठी, प्रगतीसाठी आपल्या उमेद्वार भाजपाच्या लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांना मोठया मताधिक्क्याने विजयी करून नामदार पंकजा मुंडे यांचे हात बळकट करा असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले . शनिवारी सायंकाळी पाटोदा शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले .यावेळी बोलताना आमदार धस म्हणाले की मुंडे भगिनीमुळे बीड विकास कामात प्रगती पथावर असून केंद्र व राज्य सरकार च्या माध्यमातुन बीडच्या ज़िल्ल्याच्या विकाससाठी मोठा निधी मिळाला असून या विकास कामाच्या जोरावर डॉ प्रीतम मुंडे या मोठया फरकाने विजयी होणार असल्याचे आमदार धस यावेळी बोलताना म्हणाले . यावेळी आमदार धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली ना पंकजाताई यांनी मोठी विकास कामे केल्याने राष्ट्रवादी विकासावर बोलण्या ऐवजी जातीयवाद करून गलिच्छ राजकारण करत आहे मात्र बीड ज़िल्ल्यातील जनता अपप्रचाराला बळी पडणार नसून डॉ प्रीतम मुंडे यांना साथ देईल असा विश्वास आमदार धस यांनी व्यक्त केला. बीड ज़िल्यातील बहाद्दर मतदारांनी खोटया अपप्रचार व भूलथापना बळी न पडता आपल्या बीडला विकासाच्या ट्रॅकवर आणणाऱ्या नामदार पंकजाताई मुंडे व विकासप्रिय खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले आहे .या प्रमुख कार्यकर्ता बैठकीस सय्यद अब्बूशेठ ,आनंद जाधव, बळीराम पोटे, गणेश नारायणकर ,विजय जोशी ,नयूम पठाण, किशोर अडागळे , रामेश्वर गोरे, आसिफ सौदागर ,सुमित हुले यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.