Home » माझी वडवणी » ताईंना मत म्हणजे विकासाला मत – बाबरी मुंडे

ताईंना मत म्हणजे विकासाला मत – बाबरी मुंडे

ताईंना मत म्हणजे विकासाला मत – बाबरी मुंडे

डोंगरचा राजा / आँनलाईन

खा. प्रितमताईंना निवडणुकीत जनता भरघोस मतांनी निवडून देणारच आहे.परंतु प्रीतमताईंना मत म्हणजे विकासाला मत हे मतदारांना समजले आहे. खंबीर पंतप्रधान व विकासाची दृष्टी असलेल्या खासदार हे समीकरण राखणे महत्वाचे असल्याने त्यांच्या पाठीशी मतदारांनी खंबीर उभे रहावे असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक बाबरी मुंडे यांनी मोरवड सह विविध गावात केलेल्या प्रचार दौऱ्या प्रसंगी व्यक्त केले.

बीड जिल्हा बँकेचे संचालक बाबरी मुंडे यांनी
बाहेगव्हाण,तिगांव,गांडगेवस्ती,पुसरा,
हिवरगव्हाण,मोरवड या गावात प्रचार दौऱ्या निमित्त कॉर्नर बैठका घेतल्या.
या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक बाबरी मुंडे यांच्या सोबत मच्छिंद्र झाटे, महादेव रेडे, नगरसेवक शेषेराव जगताप, नगरसेवक आत्माराम जमाले, युवा नेते राजेभाऊ मस्के, अमरसिंह मस्के, बंडू नाईकवाडे, सुग्रीव मुंडे, रामेश्वर जाधव,ब्रदीनाथ साबळे,वचिष्ठ घुगे, दिपक आंबुरे, बळीराम चोले, अनिल चोले, उत्तम नेहरकर, ईश्र्वर तांबडे, महादेव शेंडगे, ईश्र्वर नाईकवाडे, नवनाथ लंबाटे यांची उपस्थिती होती. या वेळी बोलताना बीड जिल्हा बँकेचे संचालक बाबरी मुंडे यांनी भाजप सरकारने केलेल्या विकास योजनांची उपलब्धी जनतेसमोर मांडली. न्यायालयात टिकलेले मराठा आरक्षण, धनगर समाजाच्या आरक्षण संदर्भात सरकारने न्यायालयात दाखल केलेले शपथपत्र, राष्ट्रीय महामार्गाची कामे, परळी नगर रेल्वे मार्गावर युद्ध पातळीवर सुरू असलेले काम,हे या सरकारची विशेष कामगिरी आहे. आगामी काळात विकासाचा हा वेग कायम राहण्यासाठी भाजपच्या उमेदवार डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन बाबरी मुंडे यांनी केले. दरम्यान बाबरी मुंडे यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याला जनतेने उत्तम प्रतिसाद मिळत असून कॉर्नर बैठकांचे रूपांतर जाहीर सभेत होत असल्याचे दिसत आहे.
————————–

Leave a Reply

Your email address will not be published.