Home » राजकारण » अन् आठवणीने मुस्लिम समाज गहिवरला – जगताप

अन् आठवणीने मुस्लिम समाज गहिवरला – जगताप

अन् आठवणीने मुस्लिम समाज गहिवरला – जगताप

डोंगरचा राजा / आँनलाईन

— मोहनराव जगताप यांना प्रितमताईंना मतदान करण्याचा दिला विश्वास.

माजलगाव — तालुक्यातील सरवर पिंपळगाव,सांडस चिंचोली,चिंचोली वसाहत,आळसेवाडी, आबेगाव, छत्रबोरगाव या ठिकाणी भाजप, शिवसेना, रिपाई, रासप युतीच्या अधिकृत उमेदवार प्रितमताई यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठकांचे आयोजन केले होते.
यावेळी गावातील मुस्लिम समाजातील नागरिकांनी स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचा आठवणीला उजाळा दिला, पूर आला असता गोपीनाथराव मुंडे साहेबानी गोदापरिक्रमा काडून गोदाकाटावरील लोकांना धीर दिला होता आमच्या गावात येऊन मस्जिद मध्ये भेट देऊन मुस्लिम समाजाला धीर दिला होता. गोपीनाथराव मुंडे हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे अश्या भावना व्यक्त केल्या.
मोहनराव जगताप म्हणाले की, राष्ट्रवादीच्या भुल थापाना बळी न पडता आपल्या समस्या सोडणारे व विकास करणारे नेतृत्व आपल्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रीतमताई मुंडे यांना मोठ्या मतांनी विजयी करावे असे आवाहन केले . यावेळी आबेगाव येथील झालेल्या बैठकीत युवा नेते अँड.रामेश्वर शेजुळ यांनी मोहनराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी उपस्थित भाजपा नेते डॉ. आनंदगावकर साहेब,अच्युतराव लाटे,अरुणआबा राऊत,अशोकराव तिडके,खलील पटेल,संतोष आबा यादव,बबन बाप्पा सोळंके,महावीर काका मस्के,शरद यादव,इम्रान भाई,बबनराव सिरसट,अविनाश गोंडे,दत्ता चव्हाण,अंगद कटके,ऍड. रामेश्वर शेजुळ,विजय शेजुळ,सरपंच शाहेद खान,अशोक गोरे,नवाब भाई,विलास सटाले,मौलाना खुदुस,जम्मू भाई,हिद्दू भाई यांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.