Home » माझी वडवणी » ॲड.आंबेडकरांच्या सभेस उपस्थित रहा –

ॲड.आंबेडकरांच्या सभेस उपस्थित रहा –

ॲड.आंबेडकरांच्या सभेस उपस्थित रहा —

डोंगरचा राजा / आँनलाईन

— ॲड.आंबेडकर यांच्या सभेस लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे – वंचित बहुजन आघाडी

माजलगाव — वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक विष्णू जाधव यांच्या प्रचारार्थ बहुजनांचे नेते ॲड
प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा दि. 7 रविवार रोजी मोंढा मैदान येथे आयोजित करण्यात आली असून या सभेस लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.

माजलगाव येथील मोंढा मैदान येथे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक विष्णू जाधव यांच्या निवडणूक प्रचारार्थ रविवार दिनांक 7 रोजी दुपारी एक वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.या जाहीर सभेस वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर हे या जाहीर सभेतून सत्ता परिवर्तनाची घोषणा करणार असून या जाहीर सभेत राज्य प्रवक्ते लक्ष्मण माने,अण्णासाहेब पाटील,फिरोज लाला, अजिंक्यभैय्या चांदणे, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या जाहीर सभेत तालुक्यातून लाखोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी,भारिप, एम आय एम, डेमोक्रॅटिक पार्टी, सत्यशोधक सेना, यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.