Home » ब्रेकिंग न्यूज » पात्रुडच्या सभेत पंकजा मुंडे कडाडल्या..

पात्रुडच्या सभेत पंकजा मुंडे कडाडल्या..

पात्रुडच्या सभेत पंकजा मुंडे कडाडल्या..

डोंगरचा राजा / आँनलाईन

— काँग्रेस,राष्ट्रवादीने धर्म,जातीच्या भिंती बांधल्या-
पात्रुड — मुस्लिम गावात सर्वात जास्त मतदान मुंडे साहेबाना झालेले आहे आणि आज ही मुस्लिम समाज मुंडे साहेबांना विसरला नाही.काँग्रेस ने देशात धर्माच्या भिंती बांधल्या तर राष्ट्रवादी ने जातीच्या भिंती उभारल्या आणि आता निवडणुकीत जातीचे घाणेरडे राजकारण करण्याचं काम विरोधक करत आहे त्यांना धडा शिकवा या शब्दात ना पंकजा मुंडे विरोधकांवर कडाडल्या
झुक झुक गाडी जिल्ह्यात आणण्यासाठी खा प्रीतम मुंडे यांनी प्रयत्न केले.मुंडे साहेब आमचे पिता आहेत
मग आम्ही त्यांचे नाव लावले तर बिघडले कुठे? निधी देताना मी जात विचरली नाही तर मग मतदान देताना जात पहाणार का असा सवाल ना पंकजा मुंडे यांनी केला.
दि. ४ एप्रिल रात्री ९ वाजता पात्रुड येथे भाजप उमेदवार डॉ प्रीतम मुंडे यांच्या प्रचारर्थ सभेत त्या बोलत होत्या
यावेळी व्यासपीठावर आ आर टी देशमुख,अमित पालवे, माजी आ. केशवराव आंधळे, मोहनराव जगताप, रमेश आडसकर, नितीन नाईकनवरे, राजाभाऊ मुंडे, नगराध्यक्ष सहाल चाऊस, अशोक होके, बबनराव सोळंके, अच्युत लाटे, हनुमान कदम, बबनराव सिरसट, महावीर मस्के, उपस्थित होते
पुढे बोलताना ना मुंडे
मुंडे साहेबांच्या नावात फार मोठी ताकत आहे आजही मुंडे साहेबाच्या नावावर आमचे भाऊ राजकारण करत हेच आमचे भाऊ माझ्या बाबाच्या नावावर मोठे झाले आहेत. ज्या ठिकाणी भाषण करण्यासाठी जातील ते मुंडे साहेबांचे नाव घेतल्या शिवाय राहत नाहीत. राष्ट्रवादी च्या १५ वर्षाच्या कार्य काळात काय विकास केला हे जनते समोर सांगा. राष्ट्रवादीने १५ वर्षात माजलगाव मतदारसंघात रस्ते केले ते कागदावरच झाले तर भाजप च्या ५ वर्षाच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आणले आणि कामही पूर्ण झाले झालेली कामे आज पहावयास मिळत आहेत याला म्हणतात विकास कागदावर नाही. असा आरोप ना मुंडे यांनी केला.या वेळी पातरुड पंचक्रोशीतील हजारो मतदार उपस्थित होते.या वेळी आ आर टी देशमुख,रमेश आडसकर,सहाल चाऊस यांनी आपले विचार मांडले.नितीन नाईकनवरे यांनी प्रास्ताविक केले तर दत्ता महाजन यांनी सूत्र संचलन केले

कसलाही डाग नसलेल्या चारित्र्यवान उमेदवारावर आरोप करण्यासाठी शिवाजी महाराजच्या नावाचा हळूहळू जातीचा वापर केला जातो – मोहन जगताप-

राष्ट्रवादी व काँग्रेस वाले सगळ्यात मोठे जातीयवादी आहेत निवडणुकी होई पर्यंत भाजप जातीवादी म्हणतेत आणि निवडणूक झाली भाजप ला पतिंबा घ्या म्हणतात मग तेव्हा भाजप सेक्युलर होती यांच्या भुलथापना बळी पडू नका. चारित्र्यवान उमेदवार वर आरोप करण्यासाठी शिवाजी महाराज च्या नावाचा व मराठा नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप मोहन जगताप यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published.