Home » महाराष्ट्र माझा » ना.पंकजाताईंनी जिंकली अबालवृद्धांची मने!

ना.पंकजाताईंनी जिंकली अबालवृद्धांची मने!

ना.पंकजाताईंनी जिंकली अबालवृद्धांची मने!

डोंगरचा राजा / आँनलाईन —

— काळजी करू नको, विजय प्रितमताईंचाच आहे गं पोरी, महिला, मुलींनी दिला शब्द

परळी–राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज परळी शहरातील महाविद्यालय आणि काहीजणांच्या घरी भेटी देऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी काही काळजी करू नको विजय आमची लेक डॉ. प्रितमताईंचाच होणार आहे गं पोरी असा भावनिक शब्द देत वृध्द महिलांनी ना. पंकजाताई यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवुन आशिर्वाद दिला. वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललीस विजय तर होणारच की असेही महिलांनी उदगार काढले.
खरं तर ना. पंकजाताई मुंडे या निघाल्या डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारासाठी पण भेटींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक घरी तर ना. पंकजाताईंनी लहान मुलांशी गप्पा मारुन बालपण जागवले. वृध्द महिलांशी बोलुन जुन्या आठवणी जागवल्या. भाजपाचे युवक कार्यकर्ते अनिष अग्रवाल यांच्या घरी त्यांच्या आजी श्रीमती शोभादेवी अग्रवाल यांनी साहेब प्रचाराला की आम्ही त्यांचे औक्षण करायचो आता नातसून तुझे औक्षण करते असे सांगून हे पीढ्यान पिढ्यांचं नातं असच टिकून ठेव असा वडीलकीचा सल्ला देऊन आशिर्वाद दिला. यावेळी त्यांनी ना. पंकजाताईंच्या गळ्यात पडुन मायेचा आधार दिला. यावेळी उपस्थित महिला आणि कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले.
काळजी करू नको, विजय तर प्रितमताईंचाच होणार आहे असे सांगून महिलांनी ना. पंकजाताईंना आशिर्वाद दिला. तरुणींनी ना. पंकजाताई यांच्यासोबत शल्फी घेण्यासाठी तर वृद्ध महिलांनी फोटो घेण्यासाठी गर्दी केली. आज दूपारपासुन सायंकाळपर्यंत अनेक ठिकाणी भेटी देऊन महिला, मुलींची मने जिंकली. अवघ्या काही वेळात शहरात डॉ. प्रितमताई मुंडे यांचीच चर्चा सुरू केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप व मित्र पक्षाचे नेते, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.