Home » माझी वडवणी » बैलगाडी उलटुन 2 चिमुरड्यांचा मृत्यु

बैलगाडी उलटुन 2 चिमुरड्यांचा मृत्यु

बैलगाडी उलटुन 2 चिमुरड्यांचा मृत्यु

डोंगरचा राजा / आँनलाईन

वडवणी – पाण्यासाठी बैलगाडीत भरून ठेवलेले पाण्याचे ड्रम अंगावर पडून झालेल्या दुर्घटनेत वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथील दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत झाल्याची आज सायंकाळी 7 च्या सुमारास घटना घडली आहे .या घटनेचा आई व वडील यांना मोठा धक्का बसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथील एका कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा बैलगाडीतील पाण्याचे ड्रम अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सात वाजनेच्या सुमारास घडली.. अंगणात पाण्याचे द्रॅम भरून उभी असलेल्या बैलगाडी जवळ मयत जयदेव बळीराम राठोड वय १० वर्ष आणि आविष्कार बळीराम राठोड वय ७ वर्ष हे दोघे सख्खे भाऊ खेळत होते. खेळताना गाडीच्या पाठीमागे जाऊन गाडीला लटकले त्यामुळे वजन मागील बाजूस गेल्याने त्यामधील पाण्याने भरलेले ड्रम दोघांचा अंगावर पडून झालेल्या दुर्घटनेत दोन सख्ख्या भावडांचा दुर्दैवी अंत झाला.या घटनेने चिंचाळा गावावर शोककळा पसरली आहे.
बीड जिल्ह्यात यावर्षी भीषण दुष्काळ निर्माण झाला आहे .जिल्ह्यातील मोठे आणि लघु प्रकल्प कोरडे पडले असून जिल्ह्यत जवळपास शंभर पेक्षा जास्त पाण्याच्या टँकर ने पाणी पुरवठा सुरू आहे. पाण्याची टंचाई असल्याने गावात पाण्याचा साठा करण्यासाठी ड्रम,टाकी या मध्ये पाणी भरले जाते.मात्र याच पाण्याच्या ड्रम ने दोन सख्ख्या भावांचा घात केला.

Leave a Reply

Your email address will not be published.