Home » माझा बीड जिल्हा » ना.मुंडेंनी साधला पत्रकारांशी संवाद..

ना.मुंडेंनी साधला पत्रकारांशी संवाद..

ना.मुंडेंनी साधला पत्रकारांशी संवाद —

डोंगरचा राजा / आँनलाईन

— भाजपाची लढत अफवा आणि अपप्रचार करणारांच्या विरोधात – ना.पंकजा मुंडे

— २०१९ अखेरपर्यंत बीडला रेल्वे आणणारच – खा.प्रितम मुंडे.

बीड — लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा महायुतीच्या उमेदवार खा.प्रितमताई मुंडे यांची लढत ही अफवा पसरविणार्‍या आणि अपप्रचार करणारांच्या विरोधात आहे. या अपप्रवृत्तींविरोधात आम्ही निवडणूक मोठ्या मताधिक्क्याने जिंकू, असा विश्‍वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

   बीडची निवडणूक येत्या १८ एप्रिल रोजी होत आहे. या अनुषंगाने पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.  महायुतीच्या उमेदवार खा.प्रितमताई मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे, सचिन मुळूक, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब अंबुरे, रिपाइंचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, रासपचे बाळासाहेब दोडतले आदी यावेळी उपस्थित होते.

   पुढे बोलतांना ना.पंकजाताई पुढे म्हणाल्या की, महायुतीतले सर्व घटक प्रितमताईंच्या प्रचाराला एकदिलाने लागले आहेत. भाजप-शिवसेना, रिपाई, रासपचे नेते प्रितमताईंना खासदार करण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. विरोधी पक्ष मात्र वेगवेगळ्या अफवा आणि अपप्रचार करण्यावरच धन्यता मानत आहे. भाजपाची लढत ही अशा अपप्रवृत्तींविरोधात असून यावर आम्हाला विजय मिळणार आहे. प्रितमताईंनी गेल्या साडे चार वर्षात गावागावात विकास पोहोचविला   आहे. त्यामुळे त्यांना समाजातील सर्व घटकांबरोबरच महिलांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यांनी लोकांच्या मताबरोबरच मनं जिंकली असल्याने त्या मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात आपले प्राथमिक दौरे पूर्ण झाले असून जिल्ह्यातील अनेक समाज संघटनांचा पाठिंबा आम्हाला मिळत असल्याचे त्या म्हणाल्या.

*निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार*

——————-

 विरोधकांनी प्रितमताई मुंडे यांच्याविरोधात दोन मतदारसंघात नाव असल्याचा आक्षेप घेतला होता. मात्र मुंडे साहेबांच्या कुटुंबातील सर्वांची नावं परळी तालुक्यातील नाथ्रा या गावातच नोंदवली गेलेली होती. या वेळेस वरळी मतदारसंघात प्रितमताई आणि प्रज्ञाताई यांची नावं कशी आली? विशेष म्हणजे प्रितमताईंच्या मतदान कार्डावर फोटो नसून त्यात पुरूष मतदार असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे आम्ही या संदर्भात निवडणूक आयोगाकडे हे नाव कुणी नोंदवलं या संदर्भात तक्रार करणार असल्याचे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या. या मागे मोठं कारस्थान असण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. मात्र वरळी मतदारसंघात प्रितमताईचे नोंद असलेले नाव आम्हाला माहिती नव्हते ते विरोधकांना आणि आक्षेप घेणारांना कसं काय माहीत? असाही सवाल त्यांनी केला.

 मागच्या साडे चार वर्षात रेल्वे, रस्ते या पायाभूत सुविधांवर आपण लक्ष दिलं मात्र यापुढील काळात जिल्ह्यात उद्योगासाठी लागणार्‍या पायाभूत सुविधा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळासाठी मोठी जागा लागणार आहे. त्यादृष्टीने जागेचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

*रेल्वे येणारच – प्रितमताई मुंडे*

—————————–

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्वप्नातील नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग आता सत्यात उतरतो आहे. सोलापूरवाडीपर्यंत चाचणी रेल्वे धावली असून २०१९ च्या अखेरपर्यंत बीडपर्यंत रेल्वे आणणारच असा पुनरूच्चार खा.प्रितमताई मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्या पुढे म्हणाल्या की, निवडून आल्यानंतर जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या पाल्यासाठी निवासी वस्तीशाळा सुरू करण्याचा आपला मानस आहे. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात क्रीडा क्षेत्रासाठी अद्ययावत सोयी सुविधा आणि उत्तम दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

••••

Leave a Reply

Your email address will not be published.