Home » माझा बीड जिल्हा » शिवसैनिक युती धर्म पाळणार – मुळूक

शिवसैनिक युती धर्म पाळणार – मुळूक

शिवसैनिक युती धर्म पाळणार – मुळूक

— प्रितमताई मुंडेंना प्रचंड मताने विजयी करनार – शिवसैनिकांचा एकमुखी निर्णय

डोंगरचा राजा / आँनलाईन

परळी, केज, अंबाजोगाई, माजलगाव मतदारसंघातील शिवसैनिकांसह पदाधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी बीड येथील मध्यवर्ती कार्यालय, बार्शी रोड येथे सकाळी ११ वाजता सर्व तालुका अध्यक्षांसह पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली. उद्घव ठाकरे यांच्या आदेशाने सर्व शिवसैनिक युती धर्म पाळणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दिली. तर प्रितम ताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करनार असल्याचा एकमुखी निर्णय शिवसैनिकांनी घेतला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दिलेल्या प्रसिध्दिपत्रकार म्हटले आहे, की भाजपा-शिवसेना यांच्यात अंतर्गत वाद असल्याच्या अफवा विरोधकांनी जानिवपूर्वक पसरविल्या होत्या. त्यामुळे परळी, केज, अंबाजोगाई, माजलगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांसह पदाधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक बीड शहरातील बार्शी रोडवर असलेल्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात बोलाविण्यात आली होती. या बैठकीसाठी तिन्ही मतदारसंघातील आणि सहा तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांसह उप जिल्हा प्रमुख, तालुकाप्रमुख, जिल्हा सह संघटक ,शहर प्रमुख , उप तालुका प्रमुख , उप शहर प्रमुख , विभाग प्रमुख , सर्कल प्रमुख , शाखाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सर्व शिवसैनिकांना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी मार्गदर्शन करुन उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्व शिवसैनिकांनी युती धर्म पाळावा व प्रत्येक खेड्या पाड्यातील शाखा प्रमुखांसह पदाधिकार्‍यांनी कामाला लागावे. भाजपा-शिवसेनेच्या लोकसभेच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या विजयासाठी आहोराञ काम करुन त्यांचा विजय निश्चीत करु असा एकमुखी निर्णय शिवसेने च्या पदाधीकार्यांनी घेतला. व कामाला लागावे असे आवाहन शिवसैनिकांना यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.