Home » माझा बीड जिल्हा » ​अफवा व खोट्या बातम्या पसरवू नयेत – पोलिस

​अफवा व खोट्या बातम्या पसरवू नयेत – पोलिस

​अफवा व खोट्या बातम्या पसरवू नयेत – पोलिस

डोंगरचा राजा / आँनलाईन

— धर्माळा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस व प्रशासनाचे आवाहन

बीड – धर्माळा तालुका धारुर येथे राजकीय पक्षाच्या प्रचार सभे दरम्यान झालेल्या घटनेच्या अनुषंगाने अफवा खोटी बातमी व क्लिप्स समाज माध्यमांद्वारे प्रसारित करीत आहेत. अशा प्रकारच्या घटनांमध्ये दोषी आढळल्यास कायद्यानुसार कडक कारवाईची तरतूद आहे.  या पार्श्वभूमीवर समाज स्वास्थ बिघडविणाऱ्या अफवा अथवा खोट्या बातम्या पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे
बीड लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरेशी काळजी घेतली जात असून यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. गुन्हेगारां वर कारवाई केली जात आहे तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन होऊन निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी सांगितले
धर्माळा येथील  घटनेतील  दोषी  व्यक्तीवर  पोलिसांच्या वतीने  कारवाई  केली गेली असून  राजकीय पक्षांच्या उमेदवाराशी या घटनेचा संबंध आढळून आलेला नाही. यामुळे निवडणुकीच्या काळात समाज माध्यमांवर पोस्ट प्रसारित करताना अथवा फॉरवर्ड करताना सावधानता बाळगावी तसेच चुकीच्या खोट्या बातम्या व्हायरल होत असल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणावे. यासाठी 7030008100 हा हेल्पलाईन क्रमांक पोलीस विभागातर्फे सुरू करण्यात आलेला आहे,असे जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.