Home » ब्रेकिंग न्यूज » निरीक्षक,जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा.

निरीक्षक,जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा.

निरीक्षक,जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा.

डोंगरचा राजा / ऑनलाइन

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी 39 लोकसभा मतदारसंघातील निवडणूक नियंत्रण यांच्या कामाचा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांन्डेय यांच्या समवेत संयुक्त बैठकीत निवडणूक निरीक्षक अशोक आर शर्मा आणि राजीव यांनी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात यावेळी निवडणूक निरीक्षक यांच्यासमवेत आढावा बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर,आचारसंहिता कक्षाचे प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर, आदी उपस्थित होते. तसेच निवडणूक यंत्रणेमधील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यासह विविध समन्वय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना 39 बीड लोकसभा मतदार संघातील सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज झाली. असून निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जात आहे.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री पांन्डेय यांनी केले.

यापूर्वी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर यांनी मतदारसंघातील निवडणूक पूर्वतयारीचे सादरीकरण केले. तसेच विविध सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विधानसभा क्षेत्रनिहाय तयारीचा आढावा सादर केला.जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणी साठी चांगले प्रयत्न झाल्याने मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाणात देखील वाढ झाली असून 2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी 866 असलेला जेंडर रेशो 2019 मध्ये 890 वर गेला आहे. जिल्ह्यामध्ये 4886 दिव्यांग मतदार असून त्यांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घेत आली आहे. अशा मतदारांना घरापासून मतदार केंद्रापर्यंत घेऊन जाण्या-येण्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात येणार असून यासाठी सकाळी नऊ वाजेपर्यंत विशेष प्रयत्न केले जातील. आणि दिव्यांग मतदारांचे जास्तीत जास्त मतदान होईल याकडे लक्ष दिले जाईल. दिव्यांग मतदारांच्या संख्येमध्ये माजलगाव विधानसभा मतदारसंघ सर्वात पुढे असून येथे 1424 दिव्यांग मतदार असून गेवराई मध्ये 1183 ,बीड 710 ,आष्टी 774, केज 271, परळी 524 अशी संख्या आहे.यामध्ये दृष्टिहीन अपंग मूक-बधिर अशाप्रकारे शारीरिक अपंगत्व असलेले मतदार आहेत.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मतदार केंद्राची विभागणी व व्यवस्था करताना निवडणूक प्रशासन आणि पोलीस यांनी एका ठिकाणी एक पेक्षा जास्त असलेली मतदान केंद्रे अर्थात दोन तीन चार पाच सहा पेक्षा जास्त होत असलेली मतदार केंद्र निश्चित करून त्या दृष्टीने उपाययोजना केल्या आहेत जिल्ह्यामध्ये 2325 मतदार केंद्र असून त्यामध्ये प्रमुख 2311 व 14 उप मतदान केंद्र आहेत. निवडणुकीसाठी 10232 अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले असून यासाठी एकूण 13 हजार पेक्षा जास्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा डाटा तयार ठेवण्यात आला आहे. निवडणुकीचा कणा ओळखले जाणारे मतदान केंद्र अधिकारी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहेत. मतदार जागृतीसाठी स्विप कार्यक्रम चुनाव पाठशाला उपक्रम राबविण्यात आला आहे. मतदारांना मार्गदर्शन व तक्रारी नोंदविण्यासाठी मतदार हेल्पलाईन क्रमांक 1950 आणि जिल्हा नियंत्रण कक्ष क्रमांक 22 4604 कार्यान्वित करण्यात आला आहे. आचारसंहिता काळात निवडणुकीच्या प्रक्रियेवर व गैर प्रकारांवर आळा घालण्यासाठी भरारी पथक निरीक्षण नियुक्त करण्यात आलेली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.