Home » ब्रेकिंग न्यूज » अॅड.गौतम भालेराव यांचे निधन —

अॅड.गौतम भालेराव यांचे निधन —

अॅड गौतम भालेराव यांचे निधन —

डोंगरचा राजा / आँनलाईन

गंगाखेड – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय संघटक सरचिटणीस  तसेच आंबेडकरी चळवळीचे मराठवाड्यातील बुलंद तोफ ऍड गौतम पांडुरंगराव भालेराव यांचे बुधवारी दिनांक 27 रोजी सायंकाळी सात वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 58 वर्षांचे होते.

रिपब्लिकन पक्षाचे एडवोकेट गौतम भालेराव राष्ट्रीय संघटक सरचिटणीस होते. मागील तीस वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये एडवोकेट भालेराव यांचा मोठं योगदान आहे. पालम तालुक्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीचे चेअरमन तसेच गंगाखेडचे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पद एडवोकेट भालेराव यांनी भूषविले आहे.

दिनांक 27 मार्च बुधवार रोजी सायंकाळी सात वाजता गौतम भालेराव यांना गंगाखेड येथील सम्राट निवास या राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला यातच गौतम भालेराव यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात भाऊ प्रसिद्ध वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सिद्धार्थ भालेराव यांच्यासह चार भाऊ व सहा बहीण आई दोन मुले व एक मुलगी
असा परिवार आहे एडवोकेट गौतम भालेराव यांच्या दुःखद निधनाची वार्ता परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीवर  दुःखाची शोककळा पसरली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.