Home » विशेष लेख » अनिता कळसकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार

अनिता कळसकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार

अनिता कळसकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार —

डोंगरचा राजा / आँनलाईन

कल्याण — कल्याणच्या प्रसिद्ध कवयित्री , लेखिका, व समाजसेविका अनिता प्रविण कळसकर यांना २३मार्च २०१९ला प्रेरणा फाऊंडेशन च्या प्रथम वर्धापनदिनी राज्यस्तरीय साहित्यिक व समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाला.आजपर्यंत केलेल्या संपूर्ण कामाची दखल घेऊन संपूर्ण राज्यातून निवड करण्यात आली.
प्रख्यात मा. रघुनाथ.फडके सर( आकाश वाणी मुंबई केंद्र संचालक) यांचे हस्ते स्वीकारला

.२३मार्च २०१९प्रेरणा फाऊंडेशन तर्फे जवळपास महाराष्ट्रातील १०७निवडक साहित्यिक, समाजभूषण व पत्रकार यांना त्यांच्या विविध क्षेत्रात कमावलेल्या कामगिरी साठी पुरस्कार देण्यात आले. त्या प्रसंगी प्रेरणा फाऊंडेशन च्या अध्यक्षा प्रेरणा गावकर ,सचिव मा.वैभव कुलकर्णी यांच्या पुस्तके प्रकाशन सोहळा पार पडला.अंध मुलगी दत्तक योजना सोहळा,आदिवासी गावात रस्ता,पाणी, वीज मिळवुन देण्यासाठी ही फाऊंडेशन सतत कार्यरत असते.अनाथाश्रम, अंधाश्रम,व्रूद्धाश्रम ठिकठिकाणी पाया खंबीरपणे उभा करण्यासाठी व आपले कामे समाजात पोहचवण्यासाठी या उद्देशाने पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. तसेच पर्यावरणाची माहिती(Exhibition)भरवले होते.कार्यक्रम अतिशय उत्तम रितीने पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published.