Home » ब्रेकिंग न्यूज » भीमराव जाधव यांचे निधन

भीमराव जाधव यांचे निधन

भीमराव जाधव यांचे निधन

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

पाटोदा — येथील माजी आमदार स्व.लक्ष्मणराव जाधव( तात्या ) यांचे जेष्ठ चिरंजीव भीमराव लक्ष्मणराव जाधव (मामा) यांचे दीर्घ आजाराने पाटोदा येथील राहत्या घरी 25 मार्च रोजी सायंकाळी 5. 30 च्या सुमारास
निधन झाले .मृत्यू समयी ते 58 वर्षाचे होते .भीमराव मामा हे राजकारणात सक्रीय होते .रोहयो समिती अध्यक्ष ,मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या केंद्रीय कार्यकारीचे ते सदस्य होते.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस च्या स्थापनेनंतर अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस चे पाटोदा तालुकाध्यक्ष होते. पाटोदा तालुक्यातील सर्व राजकीय घडामोडीत त्यांचा सक्रीय सहभाग असायचा ,शांत संयमी स्वभावाचा नेता म्हणून मामा जिल्हाभरात प्रसिद्ध होते. अनेक मोट्या नेत्यांत त्यांची सतत बैठक असायची. त्यांच्या निधनाने पाटोद्यावर शोककळा पसरली आहे .
गेल्या चार महिन्यापूर्वीच भीमराव मामा यांचे वडील माजी आमदार लक्ष्मणराव तात्या जाधव यांचे निधन झाले होते .भीमराव जाधव( मामा)यांच्या पश्चात आई, पत्नी ,मुलगा, मुली ,भाऊ असा मोठा परिवार असून त्यांचा अंत्यविधी उद्या 26 मार्च सकाळी 9 वाजता जानपिर मांजरसुबा रोड येथे होणार आहे. जाधव कुटुंबियांच्या दुःखात डोंगरचा राजा परिवार सहभागी आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.