Home » माझा बीड जिल्हा » जादूची कांडी फिरवली..जगतापांचा भाजप प्रवेश

जादूची कांडी फिरवली..जगतापांचा भाजप प्रवेश

जादूची कांडी फिरवली..जगतापांचा भाजप प्रवेश

डोंगरचा राजा / आँनलाईन

माजलगाव – बीड लोकसभा निवडणुकीत ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जादूची कांडी फिरवायला सुरवात केली आहे,आ विनायक मेटे यांच्या दोन जी प सदस्यांना आपल्यासोबत घेतल्यानंतर त्यांनी माजलगाव मतदार संघातील वजनदार नेते मोहन जगताप यांना भाजपमध्ये घेतले आहे,सोमवारी बीडच्या मेळाव्यात मोहन जगताप भाजपा मध्ये प्रवेश करणार आहेत.

पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील अनेक नेत्यांशी संपर्क वाढवला असून भाजप उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या विजयासाठी वेगवेगळ्या बलाढ्य नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचा सपाटा लावला आहे.

छत्रपती साखर कारखान्याच्या माध्यमातून माजलगाव मतदार संघात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे मोहन जगताप यांची नुकतीच आ सुरेश धस यांची भेट घेतली असून मोहन जगताप यांचा सोमवारी भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे .

मोहन जगताप हे माजलगाव मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत,मात्र विद्यमान आमदार आर टी देशमुख यांची समजूत कशी काढायची हा मुंडे यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे,तरीदेखील लोकसभा निवडणुकीत मोहन जगताप यांचा फायदा होईल या हेतूने त्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.