Home » माझी वडवणी » काँग्रेसलाही भगदाड.. तालुकाध्यक्ष जाधव भाजपात

काँग्रेसलाही भगदाड.. तालुकाध्यक्ष जाधव भाजपात

काँग्रेसलाही भगदाड.. तालुकाध्यक्ष जाधव भाजपात

डोंगरीचा राजा / ऑनलाईन

वडवणी तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला भगदाड पडले असून पक्षाचे तालुकाध्यक्ष रामेश्वर जाधव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

गेल्या पंधरा ते विस वर्षापासून एकनिष्ठेने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे काम करत असलेल्या रामेश्वर जाधव यांनी पक्षासाठी वाटेल ते केले. पक्षाने सोपवलेले तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी अत्यंत चोखपणे बजावली. पक्षासाठी आपण केलेल्या कार्याची दखल वरिष्ठांनी घेतली नाही. पक्षाच्या विकासाचे कार्यक्रम राबविण्यासाठी व तालुकास्तरावर पक्षांतर्गत सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी सुद्धा पाहिजे तसे सहकार्य मिळाले नाही. अनेक वेळा गावोगाव जाऊन कार्यकर्ता जोडण्याचे काम केले.मात्र त्या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रश्नासाठी कोणीच वरिष्ठ नेता सहकार्याची भावना ठेवत नसल्याने,अडी
अडचणीला पडत नसल्याने आपण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला वैतागलो आणि राम राम ठोकत असल्याच्या भावना व्यक्त करत माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ.आर.टी. देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक बाबरी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे, लोकसभेच्या उमेदवार डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उपनगराध्यक्ष राजेभाऊ पवार, युवा नेते महादेव शेळके , युवा नेते मुन्ना बडे सह आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.