Home » माझा बीड जिल्हा » महामंडळ का ? बंद केले – ना. मुंडे

महामंडळ का ? बंद केले – ना. मुंडे

महामंडळ का ? बंद केले – ना. मुंडे

डोंगरचा राजा / आँनलाईन

वडवणी – आमच्या दोन्ही बहीणबाई स्व.मुंडे साहेबांच्या वारसदार आहेत असं सांगत असुन त्यांच्याच नावाने सुरु केलेले ऊसतोड कामगाराचे महामंडळ का बंद केले असा सवाल उपस्थित करत आमच्या बहिणबाईला स्व.मुंडे साहेबाचं विकासाच्या बाबत असलेलं स्वप्न तरी माहित आहे का? असा घणघाती आरोप विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केला आहे.

आज दुपारी बारा वाजता वडवणी येथील अभय होंडा शोरुम येथे शहरातील व तालुक्यातील बुथ प्रमुखांचा मेळावा घेण्यात आला होता यावेळी मार्गदर्शक म्हणुन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते ना.धनंजय मुंडे व माजी मंञी प्रकाश सोंळके होते.या कार्यक्रमाला प्रा.सोमनाथ बडे,दादासाहेब मुंडे,नवनाथ म्हञे,बाबुशेठ नहार,गंपू पवार,सर्जेराव आळणे,भिमराव उजगरे,भानुदास उजगरे,पंजाबराव मस्के,बी.एम.पवार,दिनेश मस्के,संतोष डावकर,महादेव अंबुरे,बजरंग साबळे,सतिष बडे,अस्लम कुरेशी,दादा मुंडे,विकास मुंडे,सुग्रीव मुंडे,विठ्ठल भुजबळ,भास्कर उजगरे,समशेर शेख,सौ.शारदा उजगरे सह आदि जण उपस्थित होते यावेळी बुथ प्रमुखाना मार्गदर्शन करताना ना.धनंजय मुंडे म्हणाले कि,केंद्र सरकारने नोटबंदी फसवी झाली,सीएसटी लागू केली व्यापारी बेजार झाले,पुलनामा हल्ल्याच आणि राम मंदिराच मोदी सरकारने राजकारण करत देश लोकशाही कडून हुकूमशाही कडे जात आहे.हे वाचविण्यासाठी भाजप सरकारला हद्दपार करा असे आव्हान करत ज्या स्व.मुंडे साहेबाचं नावानं ऊसतोड कामगार काढलं तेच महामंडळ बंद करण्यासाठी आमच्या बहिणबाईनी सही करुन महामंडळ ब्रखास्त करुन साहेबाच व उसतोड कामगाराचा अपमान नाही का? असा सवाल करत आमच्या बहिणबाईना मुंडे साहेबाचं स्वप्न तरी माहित आहे का? असा घणघाती आरोप मुंडे यांनी केला आहे.तर माजी मंञी प्रकाश सोंळके म्हणाले कि,सध्या बीड जिल्ह्यात भावनेचे राजकारण होत आहे.विकास बाजूला राहत आहे.मुलभूत प्रकल्प जशाच तसेच आहेत.यामुळे भावनेचे राजकारण जिल्ह्यातून हद्दपार करा असे आव्हाण यावेळी माजी मंञी सोंळके यांनी केले आहे.यावेळी इतर मान्यवरांचे हि भाषणे झाली.तर या कार्यक्रमाला बुथ प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.