Home » महाराष्ट्र माझा » पन्नास गाढवांवर पोलिसांची कारवाई.

पन्नास गाढवांवर पोलिसांची कारवाई.

पन्नास गाढवांवर पोलिसांची कारवाई.

डोंगरचा राजा / आँनलाईन

पैठण — मानवी वावर असणार्‍या गोदापाञातुन वाळु उपसा करणार्‍या पन्नास गाढव व त्यांच्या मालकांवर आज पैठण पोलिसांनी कारवाई करत मालकांसह थेट गाढवांना पोलीस ठाणे दाखवले आहे.

         शहरात आवास योजनेसह ईतर बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने वाळुला मोठ्या प्रमाणात मागणी आहे, नव्याने रुजु झालेले पो. नि. भागीरथ देशमुख यांनी वाळुचोरीवर संपुर्णपणे आळा बसवल्याने जवसपास शहरातील सर्वच बांधकामे बंद पडली आहे. केवळ गाढवांना व बैलगाड्यांना मानवी वावर नसलेल्या गोदापाञातुन वाळु उपश्याला कोणी हटकत नव्हते.
माञ नाथषष्ठीसाठी गोदापाञ रिकामे केल्यामुळे निम्मबंधार्‍यांच्या वरच्या बाजुची वाळु उघडी पडली असता सर्व गाढव व बैलगाडी धारक या ठिकाणी वाळु उपश्यासाठी तुटुन पडले होते. या ठिकाणी दशक्रीया विधी व याञा काळात वारकर्‍यांचे फड लागत असतात व या ठिकाणाहुन वाळु उपसा म्हणजेच दुर्घटनेस आमंञण म्हणुन या मानवी वावर असलेल्या गोदापाञातुन वाळु उपश्याला मनाई करण्यात आलेली असतांना देखील गाढव मालक व बैलगाडी धारक न ऐकता या ठिकाणाहुन वाळु उपसा करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.