Home » माझा बीड जिल्हा » आ.देशमुखांचा धारुर तालुक्यात झंझावात..

आ.देशमुखांचा धारुर तालुक्यात झंझावात..

आ.देशमुखांचा धारुर तालुक्यात झंझावात..

डोंगरचा राजा / आँनलाईन

— नेतृत्व सिद्ध केलेल्या खासदारांना पुन्हा निवडुन देण्याचं आवाहन..

— ज्या राजकिय परिस्थितीत डॉ.प्रितमताई मुंडे यांनी निवडणुक लढवली आणि नंतर आपलं कर्तृत्व सिद्ध करताना जिल्ह्याच्या विकासात घेतलेली भरारी ही खर्‍या अर्थाने सर्वसामान्य जनतेच्या हिताची असुन ७० वर्षे ज्या जिल्ह्यातील लोकांनी रेल्वेच्या प्रश्‍नासाठी संघर्ष केला तो प्रश्‍न अवघ्या दोन महिन्यात मार्गी लावुन जिल्हावासियांचं स्वप्न मुंडे भगिनींनी साकार केलं.त्यांच्याबाबत जनमत तयार असुन परिणाम म्हणुन विरोधकांना उमेदवार सापडत नव्हता. केवळ विकासाचं राजकारण करणार्‍या खासदारांना पुन्हा प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन माजलगावचे आ.आर.टी.देशमुख यांनी केले. दरम्यान लोकसभा निवडणुक पार्श्वभुमीवर धारूर तालुक्यात सुरू केलेल्या झंझावती प्रचाराने वातावरण ढवळुन निघत आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी गेल्या चार दिवसापासुन माजलगावचे आ.आर.टी.देशमुख धारूर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर असुन त्यांच्या जनसंवाद संपर्क मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.काल त्यांनी आमला, कान्नापुर, म्हातारगाव, हिंगणी, कारी, कासारी बोडखा, निमला, लाटे बाभुळगाव, भोपा, चाडगाव, कोथींबीरवाडी, तेलगाव आदी गावाचा दौरा करून ग्रामस्थांच्या समोर संवाद साधला. भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी आ. केशवराव आंधळे हे त्यांच्या दौर्‍यात असुन प्रत्येक ठिकाणी गावागावात निवडणुक पार्श्वभुमीवर गावकर्‍यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. ठिकठिकाणी बोलताना आ.आर.टी.देशमुख यांनी डॉ.प्रितमताई यांनी खासदार म्हणुन पाच वर्षात केलेली कामगिरी ही लोकांच्या डोळ्यासमोर असुन बीड-परळी-नगर रेल्वेचा सुटलेला प्रश्‍न, जिल्ह्यात पसरलेले राष्ट्रीय महामार्गाचे जाळे एवढंच नव्हे तर पालकमंत्री ना.पंकजाताई यांनी संपुर्ण जिल्ह्यात विकासाची महाचळवळ उभा करून केवळ विकासाचं राजकारण केलं आणि शासनाच्या केंद्रातील व राज्यातील सर्व योजना सर्वसामान्य जनतेच्या दारात आणुन ठेवल्या ज्याचा फायदा आम जनतेला झाला. स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्यावर बीड जिल्ह्यानं प्रेम केलं. हा जिल्हा विकासाच्या प्रक्रियेत पुढे यावा हे साहेबांचं स्वप्न मुंडे भगिनीच्या हातुन पुर्ण होत असताना त्यांच्या नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहुन पुन्हा एकदा आशिर्वाद देण्याचे आवाहन आर.टी.देशमुख यांनी ग्रामस्थांच्या बैठकीत बोलताना केले. माजी आ.केशवदादा आंधळे यांनीही जिल्ह्याच्या राजकारणात विकासाचा नवा अध्याय मुंडे भगिनीच्या नेतृत्वाखाली सुरू झाल्याने आता खर्‍या अर्थाने विकास लोकांच्या दृष्टीस पडत असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. या दौर्‍यात तालुका अध्यक्ष अंगद मुंडे, सभापती महादेवरावजी बडे, विजय लगड, गोरख धुमाळ,गणेश बडे, बंडु खांडेकर, शिवाजी मुंडे, अतुल ठोंबरे, दिलीप बडे, विठ्ठल गोरे आदीसह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांनी उत्स्फुर्त पाठिंबा देताना आम्ही खा.प्रितमताईंना प्रचंड मताने निवडुन देवु अशी ग्वाही दिली.दरम्यान धारूर तालुक्यात आमदाराच्या झंझावाताने वातावरण ढवळुन निघत असुन तब्बल चार दिवस ते या भागात जनसंवाद मोहिमेवर असल्याचे कळते.

Leave a Reply

Your email address will not be published.