Home » विशेष लेख » विद्या मंदिर इंग्लिश स्कूलमध्ये मात्तृ-पितृ पूजन दिन

विद्या मंदिर इंग्लिश स्कूलमध्ये मात्तृ-पितृ पूजन दिन

विद्या मंदिर इंग्लिश स्कूलमध्ये मात्तृ-पितृ पूजन दिन

डोंगरचा राजा / आँनलाईन

व्हॅलेंटाईन डे चा निमित्ताने जगा वेगळा आदर्श उपक्रम राबवल्याने दिंद्रुडसह परिसरात शाळेचे कौतुक होत होते.

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील विद्यामंदिर इंग्लिश स्कूलमध्ये मात्तृ-पितृ पूजन दिन साजरा करण्यात आला.

दि.14 फेब्रुवारी हा दिवस सगळीकडे व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो ,परंतु प्रेमाची व्याख्या मर्यादित न राहता त्या दिवशी आपले दैवत आई-वडिलांची पूजा करून मात्या पित्यावर भरभरून प्रेम करा, हा संदेश देण्याच्या दृष्टीने या वर्षी नव्याने सुरू झालेल्या देवदहिफळ कॉर्नर जवळील विद्यामंदिर इंग्लिश स्कूलमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक सदाशिव अप्पा शेटे, सुरेश पासंगे, कैलास साळुंके, सहशिक्षक लांडगे सर, विशाल डाके सर, पांचाळ महाराज, बालासाहेब ठोंबरे, पत्रकार प्रकाश काशिद, , बंडू खांडेकर ,संतोष स्वामी, अमोल ठोंबरे ,सुरेश पासंगे ,वैजनाथ महाराज कटारे ,प्रकाश महाराज ठोंबरे, दत्ता शिंदे ,महादेव पांचाळ आदी उपस्थित होते.
या मातृ- पितृ पूजन कार्यक्रमात पाल्यांनी आपल्या आईवडीलांची पुजा करत पुष्पहार अर्पण केला.आई वडिलांभोवती प्रदक्षिणा घातली. या आदर्श उपक्रमामुळे पालकांत संतोषाची झलक दिसुन आली.

Leave a Reply

Your email address will not be published.