Home » ब्रेकिंग न्यूज »  भितीपोटी दिलेली खोटी तक्रार घेतली मागे.

 भितीपोटी दिलेली खोटी तक्रार घेतली मागे.

 भितीपोटी दिलेली खोटी तक्रार घेतली मागे.

  रविकांत उघडे / डोंगरचा राजा आँनलाईन

माजलगांव, दि. 13 प्रतिनिधी: माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थांनी झालेल्या तिन लाख चोरी प्रकरणाशी आपला संबंध नसतांना देखिल पोलिसात तक्रार देण्यात आली होती. पोलिस आपल्याला अटक करतील या भितीपोटी माजी मंत्री सोळंके यांच्या विरूध्द मागील पंधरा वर्षांपासुन बलात्कार करत असल्याची जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे दिलेली खोटी तक्रार मागे घेतली असल्याचा जवाब सदरील महिलेने पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज दि. 13 बुधवारी दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरापासुनच जवळ असलेल्या केसापुरी वसाहत नजिक माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचा बगला आहे. त्यांच्या बेडरूममधून तिन लाख रूपयांची चोरी झाली होती. या चोरी प्रकरणी त्यांचे विश्वासू नौकर व स्वंयपाकी यांच्याविरूध्द शहर पोलिसात दि. 10 रविवारी चोरीची तक्रार देण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी चैकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावुन घेतले. आता आपणास याप्रकरणी अटक होणार या भितीपोटी दि. 12 मंगळवारी जिल्हा पोलिस अधिक्षक बीड यांच्या नावाने माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी माजी पंधरा वर्षांपासून बलात्कार केल्याबाबतची तक्रार केली होती. वास्तविक पाहता तसा प्रकार घडलेला नाही. तो दिलेला अर्ज चुकीचा आहे. फक्त माजी आमदार प्रकाश सोळंके व त्यांच्या घरच्यांनी यापुढे आमच्यावर कसल्याही प्रकारचे आरोप घेउ नयेत एवढीच आमची इच्छा आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे मंगळवारी दिलेला तक्रारी अर्ज खोटा असल्याने मागे घेत आहे. याबाबत आपल्यावर कसल्याही प्रकारचा दबाव नसल्याचा जवाब पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्या समक्ष दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.