दत्ता कांबळे यांची निवड
रविकांत उघडे / डोंगरचा राजा आँनलाईन
अंबाजोगाई:(प्रतिनिधि): येथील नगरपरिषद येथे भारतीय कॉंग्रेस पक्षाचे ननिर्वाचित अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांचा सत्कार कॉंग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी दत्ता कांबळे हे एक आंबेडकरी चळवळीतिल संघर्षमय नेत्रत्व असुन ,कांबळे यांच्या निवडीने भारतीय कॉंग्रेस पक्षाने समस्त आंबेडकरी समुदायस सामाजिक न्याय मिळवून दिला आहे,त्याचप्रमाणे समाजातिल अतिसामान्य घटकाने कॉंग्रेस पक्षात सामिल हाऊन संविधानाचे रक्षण करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे हात बळकट करावेत असे मत प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
तसेच कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या नेत्रत्वाखाली जिल्हाभर अनुसूचित जाती सेल च्या कर्यकर्त्यांना सामजिक व राजकीय प्रतिस्ठा मिळुन देण्याचे अश्वासन नवनिर्वाचित अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी दिले .
यावेळी सत्कार प्रसंगी भारतीय कॉंग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असेफ बाबा,शहराध्यक्ष महादेव आदमाने,नगरसेवक सुनिल व्यवहारे, राजीवगांधी पंचायती राज संघटन जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण, नगरसेवक गवळी,गणेश मसने,मुख्तार भाई व इतर प्रमूख कर्यकर्त्यांची उपस्थिती होती .