Home » देश-विदेश » खा.प्रितमताईंच्या दौऱ्याला जोरदार प्रतिसाद..

खा.प्रितमताईंच्या दौऱ्याला जोरदार प्रतिसाद..

खा.प्रितमताईंच्या दौऱ्याला जोरदार प्रतिसाद..

रविकांत उघडे / डोंगरचा राजा आँनलाईन

बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार प्रीतम ताई मुंडे यांच्या माजलगाव तालुक्यातील संपर्क दौऱ्याला जोरदार प्रतिसाद मिळाला या दौऱ्या दरम्यान त्यांनी अनेक सभामंडप व विकासकामांचे उदघाटन केले

दी 12 व 13 फेब्रुवारी रोजी खा प्रीतम ताई मुंडे यांनी माजलगाव तालुक्यात संपर्क दौरा केला या वेळी खा प्रीतमताई सोबत आ आर टी जिजा देशमुख, रमेश आडसकर,माजी सभापती नितीन नाईकनवरे,सहाल चा ऊस,बबनराव सोळंके, हनुमान कदम, ज्ञानेश्वर मेंढके,दीपक मुंडे,अरुण राऊत, मनोज जगताप, यांच्या सह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती नितीन नाईकनवरे यांच्या निवासस्थानी माजलगाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा छोटेखानी मेळावा घेण्यात आला या नंतर मोठेवाडी, गंगामसला, सादोळा या गावात जनतेच्या गाठीभेटी घेण्यात आल्या सादोला येथिल 3 कोटी रु खर्चून बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन करून लोकार्पण करण्यात आले दी 13 रोजी खतगव्हाण,नित्रुड,पात्रुड, केसापुरी कॅम्प येथे मूकबधिरांच्या आयोजित तपासणी मेळाव्यात त्यांनी दिव्यांग मुला मुली सोबत संवाद साधला या वेळी नीत्रुड येथे खासदार निधीतून मारोती मंदिरा समोर बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण झाले नंतर लिमगाव व मोगरा येथे भेटी घेतल्या मोगरा येथे आमदार निधीतून उभारन्यात आलेल्या विठ्ठल मंदिर व खंडोबा मंदिरा समोरील सभामंडपाचे लोकार्पण झाले या प्रसंगी आ आर टी देशमुख यांनी आगामी नीवडणुकीत खा प्रीतम ताईचा निकाल आजच घोषित झाला असून मागच्या निवडणुकीत त्यांच्या विक्रम त्याच मोडणार असल्याचे सांगितले खा प्रीतम ताई मुंडे यांनी मागील साडे चार वर्षांत झालेला विकास कामांचा आढावा घेऊन झालेली विकास कामे समोर ठेवूनच आम्ही जनतेसमोर जाणार असल्याचे सांगितले केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजना या नवीन भारत निर्माण करणाऱ्या असून मागील 55 वर्षात जी विकासाची कामे झाली नाहीत ती कामे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात झाली आहेत जिल्ह्यात बीड नगर परळी रेल्वे साठी 2 हजार कोटींचा निधी,राष्ट्रीय महामार्गाचे जाळे,मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पक्क्या रस्त्याने जोडलेला ग्रामीण भाग हे भारतीय जनता पक्षाचे बलस्थान आहे विकासाचा हाच वेग पुढे घेऊन जाण्यासाठी केंद्रात नरेंद्र मोदी असणे गरजेचे आहे त्या साठी जनतेनी भाजपा च्या पाठीशी खंबीर उभे रहावे असे त्यांनी सांगितले या दौऱ्या दरम्यान खा प्रीतम ताईंचे ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून त्यांना ओवाळले दरम्यान नागरिकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादा मधे त्यांचा माजलगाव तालुक्यातील दौरा उत्साहात संपन्न झाला

Leave a Reply

Your email address will not be published.