250 वयोवृद्धांची 61 वी साजरी
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन
टोोपाटोदा : तालुक्यातील पारगाव घुमरा येथे अखंड़ हरीनाम सप्ताहात रामचंद्र बोधले महाराज चरीञ कथा व ज्ञानेश्वर पारायणाचे आयोजन ग्रामस्थानी केले होते .
या सप्ताहामध्ये दि 11/2/2019 रोजी प्रकाश बोधले महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले
ग्रामस्थानी आखील भारतीय वारकरी मंड़ळाचे ह.भ.प.प्रकाश बोधले महाराज यांची 61 वी साजरी करण्याचे ग्रामस्थानी व युवकांनी ठरवले . प्रकाश बोधले महाराज यांनी आपल्या बरोबर सर्व समाजातील व्यक्तीचे वय 61 च्या पुढे झाले आहे त्यांच्या बरोबर आपली 61 वी साजरी करण्याचे ग्रामस्थांना व युवकांना सुचवले त्यानुसार गावातील 250 वयोवृद्धांचा सन्मान सोहळा करण्यासाठी शिवशंकर घुमरे ,आशोक घुमरे, राजेन्द्र घुमरे,प्रदीप घुमरे, एकनाथ घुमरे आदींनी या सत्कार कार्यक्रमाचा भार उचलला यावेळी प्रकाश बोधले महाराज यांच्या हस्ते या सर्व 61 वी पार केलेल्या नागरीकांचा सपत्नीक सत्कार केला .
या कार्यक्रमास सभापती पुष्पाताई सोनवणे, महेन्द्र गर्जे, बबनराव सोनवणे, दिपक घुमरे, सुधीर घुमरे, गुलाबराव घुमरे, युवराज घुमरे, मदनबप्पा घुमरे ,प्रभाकर घुमरे,नानासाहेब ड़िड़ूळ,संतोष तांबे यांच्या सह पारगाव व परीसरातील हजारो भावीक भक्त उपस्थित होते.