Home » विशेष लेख » संत गिरी महाराज जीवनावर चित्रपट प्रदर्शित.

संत गिरी महाराज जीवनावर चित्रपट प्रदर्शित.

संत गिरी महाराज जीवनावर चित्रपट प्रदर्शित.

अमोल जोशी डोंगरचा राजा ऑनलाईन

 

पाटोदा- तालुक्यातील पिठी येथील जन्मभूमीतील संत माणिक गिरी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे प्रदर्शन पिठी याठिकाणी करण्यात आले.
तालुक्यातील पीठी येथील संत माणिक गिरी महाराज यांचा जन्म झालेला असून वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना अध्यात्मिक सत्संग लागला नंतर त्यांनी अध्यात्माबरोबरच समाजसेवा करण्यासाठी योगदान देण्याचा निर्धार करून सुरुवातीला आष्टी तालुक्यात वाहिरा या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे काम करून मंदिर निर्मिती केली नंतर हळूहळू त्यांनी संगमनेर येथे जाऊन मठाची निर्मिती केली आणि मंदिरे या परिसरात उभी केली बीड जिल्ह्यात पेक्षा संगमनेर नाशिक अहमदनगर आधी जिल्ह्यात त्यांचा भक्तगण मोठ्या प्रमाणावर असल्याने संत माणिक गिरी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित संत माणिक गिरी महाराज चित्रपट निर्माण केला असून हा चित्रपट महाराजांच्या मूळ जन्मगावी प्रदर्शित करण्याचा निर्धार चित्रपट दिग्दर्शक सूर्यभान गीते निर्माते भाऊ गीते ,गणेश पवार, कलाकार अंजली माळी, आकांक्षा बोरसे, गौरव गिते सह नाशिक संगमनेर येथील सर्व कलाकार तिप्पटवाडी संस्थांचे मठाधिपती ह भ प महाराज हनुमान टेकडी संस्थांचे ह भ प शिवाजी महाराज येवले त्याचप्रमाणे पाटोदा वरून प्राचार्य तथा पत्रकार तुकाराम तुपे ,सय्यद साजिद ,हमीद पठाण ,राहुल सोनवणे आदी उपस्थित होते चित्रपट प्रदर्शनावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत समारंभपिठी येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले यावेळी सरपंच राधाकिशन तुपे ,चेअरमन शिवाजीराव कूडके, नामदेवराव कोठेकर, श्रीधर भोंडवे पाटील, वसंतराव जागडे, प्रकाशराव कुडके, अशोक भोंडवे ,रविशंकर बेद्रे, कल्याण गिरी सह सर्व गावकऱ्यांनी उपस्थितांचे स्वागत केले चित्रपट पाहण्यासाठी पिठी येथील ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार बाबासाहेब खोडके यांनी व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published.