मोहखेडच्या तरुणाचा पुण्यात अपघाती मृत्यु
डोंगरचा राजा / आँनलाईन
धारुर तालुक्यातील मोहखेड येथिल तरुणाचा पुण्यात अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दि ११ रोजी सायंकाळी घडली.
मोहखेड येथिल पांडुरंग श्रीमंत सोळंके (वय ३५) दिवसभर कंपनी चे काम आटोपून मोटारसायकल वर घरी निघाले असता कंपनी बाहेरच ट्रकखाली आल्याने जाग्यावर मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर त्यांना मोहखेड येथे आणण्यात आले.
सुस्वभावी, मितभाषी, अभियांत्रिकी शिक्षण घेऊन पुण्यात नोकरी करत असतांना गावाशी नाळ जोडलेले पांडुरंग सोळंके हे मोहखेड ग्रामस्थांचे लाडके होते. त्यांचा अपघाती निधनाने मोहखेड व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मयत पांडुरंग सोळंके पश्चात आई वडील, पत्नी तिन बहिनी असा परिवार असुन एकुलता एक लेक गमाल्याने सोळंके परिवारावर दुखा: चा डोंगर कोसळला आहे.