Home » ब्रेकिंग न्यूज » चारित्र्याचा संशय,पतीने केला पत्नीचा खून

चारित्र्याचा संशय,पतीने केला पत्नीचा खून

चारित्र्याचा संशय,पतीने केला पत्नीचा खून

डोंगरचा राजा / आँनलाईन

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून  खूनकेला. ही घटना माजलगाव शहरातील मॅनकॉट जिनींगमध्ये आज सकाळी घडली. उषा गणेश ढवळे (२२, रा.शेलगाव देशमुख ता.मेहकर जि.बुलढाणा ह.मु.माजलगााव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. गणेश ढवळे या आरोपीला पोलिसांनी एका तासात बेड्या ठोकल्या आहेत.

उषा व गणेश ढवळे हे दाम्पत्य कामगार आहे. मागील काही दिवसांपासून ते कामासाठी माजलगावला आले होते. शहरातीलच मॅनकॉट जिनींगवर काम करून उदरनिर्वाह भागवित होते. गणेशचा पत्नीवर नेहमी संशय असे. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिला मारहाण करण्याबरोबरच तिचा शारिरीक व मानसिक छळ करीत होता. याच संशयातून दोघांमध्ये वाद झाले. यातच गणेशने उषाचा गळा दाबून खून केला. शनिवारी सकाळी सात वाजता ही घटना उघडकीस आली.

Leave a Reply

Your email address will not be published.