Home » ब्रेकिंग न्यूज » दोन विद्यार्थीनीं शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र. 

दोन विद्यार्थीनीं शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र. 

दोन विद्यार्थीनीं शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र. 
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन 
पाटोदा — तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी कुमारी शिंदे आरती नवनाथ व गोरे असलेशा सतीश यांनी केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक एन एम एम एस परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्या असून या विद्यार्थिनींचा सत्कार विद्यालयात करण्यात आला एन एम एम एस परीक्षेत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती पात्र झाल्याबद्दल त्यांचा विद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम तुपे हे होते यावेळी एन एम एम एस एनटीएस परीक्षा केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या मार्फत घेण्यात येतात या परीक्षांमध्ये पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी पर्यंत चार वर्षासाठी बारा हजार रुपये प्रति वर्षाला शासनामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते त्याच प्रमाणे एन टी एस परीक्षेत पीएचडी व उच्च शिक्षणापर्यंत शासनाची शिष्यवृत्ती मिळते या सर्व परीक्षेसाठी विद्यालयातून दरवर्षी इयत्ता आठवी व दहावी वर्गातील विद्यार्थी प्रविष्ट होत असतात त्याचप्रमाणे विद्यालयातून देशपातळीवर व राज्य पातळीवरील शासनाच्या व संस्थेच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला व उपक्रमासाठी विद्यार्थी दाखल केले जात असून या सर्व क्षेत्रातील परीक्षा उपक्रमांमध्ये विद्यालयाचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या बरोबरच पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत ही गौरवशाली परंपरा विद्यालयात अनेक वर्षापासून चालू असून विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून घडविण्याचे काम वसंतराव नाईक विद्यालय करीत आहे मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव श्री आदरणीय रामकृष्ण बांगर साहेब ,सौ सत्यभामा ताई बांगर, प्राचार्य तुकाराम तुपे ,पर्यवेक्षक  मोमीन एम एस ,परीक्षा विभाग प्रमुख पाखरे अशोक, स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख नागरगोजे एम आर विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नागरगोजे एम आर यांनी केले तर आभार पर्वेक्षक एम एस यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published.