Home » क्राईम स्टोरी » डॉ.सुदाम मुंडे व सौ.मुंडे यांना 10 वर्षाची शिक्षा

डॉ.सुदाम मुंडे व सौ.मुंडे यांना 10 वर्षाची शिक्षा

डॉ.सुदाम मुंडे व सौ.मुंडे यांना 10 वर्षाची शिक्षा

डोंगरचा राजा / आँनलाईन..

– मयत महिलेच्या पतीलाही शिक्षा सुनावली.

— जिल्हा न्यायालयाचा निकाल.

– परळी स्त्रीभ्रुण हत्या प्रकरण.

बीड– महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये खळबळ उडवून देणार्‍या परळी येथील स्त्रीभ्रुण हत्या प्रकरणाचा आज निकाल लागला.जिल्हा न्यायालयाने क्रुरकर्मा सुदाम मुंडे,सरस्वती मुंडे आणि मयत महिलेचा पती या तिघांना दोषी ठरवून तिघांनाही दहा वर्षाची शिक्षा सुनावली. या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून होते. त्यामध्ये बारा आरोपी निर्दोष मुक्त झाले.या प्रकरणातील काही साक्षीदार फितूर झाले होते.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात २०१२ साली डॉ.सुदाम मुंडे याचं स्त्रीभ्रुण हत्येचं कुकर्म उघडकीस आलं होतं. डॉ.मुंडे याच्या हॉस्पीटलमध्ये विजयमाला पटेकर या महिलेचा बेकायदेशीरपणे गर्भपात करण्यात आला होता. गर्भपात करताना महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंडे याच्या विरोधात फास आवळण्यात आला. त्याच्याविरोधात परळी पोलीस ठाण्यात कमल ३०४, ३१२, ३१४, ३१५, ३१६ नुसार गुन्हा दाखल झाला होता. त्याचबरोबर पीसीपी एनडीटी आणि एमटीबी कायद्यानुसार कलम ३ ए,कलम ९,कलम १७,कलम १९ नुसारही गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणाचा सर्व तपास करून परळी पोलिसांनीं बीड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हे प्रकरण के.एस.गांधी यांच्या न्यायालयात सुरू होते. आज दुपारी न्यायालयाने सुदाम मुंडे, सरस्वती मुंडे आणि महिलेचा पती महादेव पटेकर या तिघांना दोषी ठरवून तिघांनाही प्रत्येकी दहा वर्षाची शिक्षा सुनावली असून प्रत्येकी ५० हजार रूपयांचा दंड आकारला. या प्रकरणातील काही साक्षीदार फितूर झाले होते. मात्र न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावल्याने न्यायालयावरील विश्‍वास आणखी वाढला आहे. या प्रकरणात एकुण २२ साक्षीदार तपासण्यात आले होते. सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील अॅड.मिलिंद वाघीरकर यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published.