Home » महाराष्ट्र माझा » येवती येथे 102 सैनिकांचा गौरव.

येवती येथे 102 सैनिकांचा गौरव.

येवती येथे 102 सैनिकांचा गौरव.

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

– वार्षिक संजीवनी समाधीकाल महोत्सव.

– अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न.

– मुखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र येवती येथे सदगुरु नराशाम महाराज यांचा वार्षिक संजीवनी समाधी काल महोत्सव व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. यावेळी संस्थानच्या वतीने 102 सैनिकांचा गौरव करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
मुखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र येवती येथे सदगुरु नराशाम महाराज यांची संजीवन समाधी आहे. सदगुरु नराशाम महाराज यांचा वार्षिक संजीवनी समाधी काल महोत्सव नुकताच येवती येथे उत्साहात संपन्न झाला आहे. वार्षिक संजीवनी समाधी काल महोत्सवानिमित्त ह.भ.प. अनंत महाराज बेलगावकर यांचा श्रीमद् भागवत कथा कार्यक्रम संपन्न झाला आहे. सप्ताह कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येवती येथे सदगुरु नराशाम महाराज मठ संस्थानच्या वतीने 102 सैनिकांचा सत्कार करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सदगुरु नराशाम महाराज, नांदेडचे उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसीलदार अरविंद नरसीकर, तहसीलदार अतुल जटाळे, तहसीलदार सौ. सुरेखा नांदे, अनंत महाराज बेलगावकर, पोलीस निरीक्षक सुभाष राठोड, भार्गव राजे, हेमंत भेंडे, विशाल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. सप्ताह कालावधीत देगलूरचे आमदार सुभाष साबणे, मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, माजी जि.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, नगराध्यक्ष बाबूराव देबडवार, शेषराव चव्हाण, स्वप्नील चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, ॲड.बळवंत पाटील बेटमोगरेकर, बाबाराव एंबडवार,येवती गटाच्या जि प सदस्या शकुंतलाबाई बोनलेवाड, संतोष बोनलेवाड, राजन देशपांडे, बालाजी बच्चेवार आदी मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. सप्ताह कालावधीत सकाळचे अन्नदान पदमवार कंधारकर यांनी केले आहे तर संध्याकाळचे अन्नदान येवती ग्रामस्थांनी केले आहे अन्नदानासाठी येवती ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश पवार व जि प सदस्य पुनम पवार यांनी दिनांक 27 रोजी महाप्रसादाचेआयोजन केले होते महाप्रसादास भाविकांनी मोठी गर्दी केली होती . सद्गुरु नराशाम महाराज यांच्या आशीर्वादाने सद्गुरु नराशाम महाराज यांचा वार्षिक संजीवनी समाधी काल महोत्सव श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह व विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे कार्यक्रमास नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. कार्यक्रमास ह भ प देवपुरी महाराज कहाळा, नामदेव महाराज बारूळकर, कालिदास महाराज पाळेकर, शिध्दोनंदजी महाराज हळदेकर, सिध्दयाल महाराज बेटमोगरेकर, विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, अर्जुन महाराज लातूरकर यांनी हजेरी लावली आहे. सप्ताह कालावधीत रक्तदान शिबिर, हृदयरोग निदान शिबिर, आयुर्वेदिक शिबीर मोठ्या उत्साहात झाली आहेत. मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड व पोलिस कर्मचाऱ्यांनी सप्ताह कालावधीत चोख बंदोबस्त ठेवला आहे. बाळु महाराज जोशी व येवती ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.