Home » राजकारण » ज्यांनी कामं मंजूर केली,त्यांनाच निमंत्रण – आ.क्षिरसागर

ज्यांनी कामं मंजूर केली,त्यांनाच निमंत्रण – आ.क्षिरसागर

ज्यांनी कामं मंजूर केली,त्यांनाच निमंत्रण – आ.क्षिरसागर

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड शहराच्या विकासासाठी मागील 4 वर्षात तीनशे कोटीहून अधिक कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजूर करून घेण्याचे काम बीड नगरपालिकेने केलेले आहे. आता झालेल्या कामांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 6 फेब्रुवारी रोजी करण्यात येत आहे. हा कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थेचा आहे. याला कोणीही राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केलं.

बीड शहराच्या विकासासाठी ज्यांनी कामं मंजूर केली, त्यांनाच आपण योजनांच्या उद्घाटनासाठी बोलवत आहोत. हा कार्यक्रम राजकीय नसल्याचे स्पष्ट करून आमदार क्षीरसागर यांनी आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. यामुळं विरोधकांमध्ये आणखीनच संभ्रम निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.