बळीराम दळवे ला सुवर्ण पदक
डोंगरचा राजा / आँनलाईन..
— राज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धेत माजलगाव चा बळीराम दळवे ला सुवर्ण पदक
— ५० मिटर व्हीलचेयर अस्थिव्यंग प्रवर्गात प्रथम
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन, अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य आणि क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था चांदूर बाजार अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच अमरावती येथे दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत अस्थिव्यंग प्रकारात माजलगाव येथिल या जगदंब शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै.भैय्यासाहेब देशमुख अस्थिव्यंग निवासी विद्यालय शाळेतील बळीराम महादेव दळवे या विद्यार्थ्याने शाळेचे नाव रोशन करत ५० मिटर व्हीलचेयर स्पर्धेत राज्यात प्रथम येत सुवर्ण पदक मिळवले आहे.
तालुक्यातील दिंद्रुड चा बळीराम दळवे हा बालपणापासुन अस्थिव्यंग असुन माजलगाव येथिल कै.भैय्यासाहेब देशमुख अस्थिव्यंग विद्यालयात इयत्ता पाचवीला शिक्षण घेत आहे. नुकत्याच अमरावती येथे संपन्न झालेल्या अंध, मतिमंद, कर्णबधिर,अस्थिव्यंग, बहुविकलांग प्रवर्गातून राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत अस्थिव्यंग प्रवर्गात बळीराम महादेव दळवे याने १३ ते १६ वर्षीय गटात ५० मिटर व्हीलचेयर स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे.अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे चे आयुक्त बालाजी मंजुळे यांच्या हस्ते बळीराम ला सुवर्णपदक व प्रमाण पत्र देत सन्मानित करण्यात आले.
त्याच्या या यशा बाबत संस्थाअध्यक्ष माणिकराव शेटे,उपाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख,सचिवभगवानराव देशमुख, मुख्याध्यापक देवदत्त गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.