सुदामतीबाईंनी घेतला अखेरचा श्वास..
डोंगरचा राजा / आँनलाईन..
— उपचारासाठी दानशुरांकडून मदतीचा ओघ होता सुरु.
साळींबा येथील कॅन्सरग्रस्त सुदामतीबाई शिंदे यांच्यावर उपचार चालु असताना पुणे येथील कॅन्सर रुग्णालयात अखेर रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. आर्थिक परस्थिती नाजुक असल्याने दैनिक पुढारीतुन मी मदतीचे अवाहन केल्यानंतर अनेक दानशुरांनी मदत दिली होती माञ प्रयत्नांना यश आले नाही.
सुदामतीबाई शिंदे यांच्यावर अगोदर बार्षी येथे उपचार करण्यात आले माञ कॅन्सरची स्टेज वाढल्याने आणि प्रकृती अत्यंत नाजुक झाल्यामुळे पुढील उपचारासाठी पुणे येथील दवाखान्यात त्यांना नेण्यात आले होते.
गुंठाभरही जमिन नसलेल्या सुदामतीबाई चार मुली, एक मुलगा आणि वयोवृद्ध पतीच्या संसाराचा गाडा राञदिवस मेहनत करुन चालवत असत. दिड ते दोन क्विटल कापुस वेचुन दिवसाला पाचशे ते आठशे रुपये मजुरी मिळविणारया सुदामती शिंदे यांनी आपल्या चारी मुलींना शिक्षण देवुन त्यांचे लग्नही केले होते. एकुलत्या एक मुलगा शासकीय अधिकारी व्हावा हे स्वप्न मनाशी ठेवुन त्यांनी मुलाला पुण्यात उच्च शिक्षणास ठेवले. मुलगा स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता. आई मजुरी करुन पैसे पुरवत होती माञ आईला कॅन्सर झाला. खुप उपचार करुनही उपयोग झाला नाही. दैनिक पुढारीच्या माध्यमातुन मी मदतीचे अवाहन केल्यानंतर मदतीसाठी दानशुर धावुन आले. भरघोष मदत जमली. चर्मकार महासंघाच्या मराठवाडा अध्यक्षा सुनिता नेटके यांच्या पुढाकरातुन, तालुकाध्यक्ष मधुकर ठोसर, यांनी पुण्याच्या दवाखान्यात दाखल केले. माञ यश आले नाही. साळिंबा गावासह वडवणी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी सकाळी अंत्यविधी होणार आहे.
चौकट
नेते मंडळी व नागरीकांकडून झाली आर्थिक मदत
माजी मंञी प्रकाश सोळंके, छञपती साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव जगताप, चर्मकार महासंघाच्या मराठवाडा अध्यक्षा सुनिता नेटके यांच्यासह बंजारा समाजाचे नेते नरेंद्र राठोड यांची एक वर्षीय संस्कृती राठोड, माजी जि. प. सदस्य अमित उजगरे, महंत विट्ठल महाराज, औरंगाबादचे डाॅ. रमेश बजाज, बालरोगतज्ञ डाॅ. गुरुदत्त महादर यांच्यासह साळिंबा जि. प. शाळेचे सहशिक्षकांनी आर्थिक मदत केली. युरोमध्ये नोकरीस असणारया दादासाहेब निपटे यांनी देखील खात्यावर मदतीची रक्कम टाकली. तर विलास बामणे यांनी पेशंट पुण्याला घेऊन जाण्यासाठी गाडीभाडे दिले होते. गावातील जाजाऊ प्रतिष्ठाण व गावकरयांनीही वर्गणी गोळा केली होती.