वस्तीग्रहातील 16 मुलांना विषबाधा..
डोंगरचा राजा / आँनलाईन..
वडवणी शहरातील एका खाजगी वस्तीग्रहात वास्तव्यास असलेल्या पंधरा ते सोळा मुलांना वरण भातामधुन विषबाधा झाली असून त्यांच्या वर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वडवणी शहरात खासगी वस्तीग्रहांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
शहरात खाजगी वस्तीग्रहातील 15 ते 16 मुलांना वरण-भातामधून विष बाधा झाली आहे. उपचारासाठी जिल्हा रुग्णालय बीड येथे दाखल करण्यात आले असून परमेश्वर चव्हाण असे वस्तीग्रह चालकांचे नाव आहे. या ठिकाणी प्रल्हाद शेळके, नितीन लांडे ,कृष्णा वरकटे, अभिजीत पवार ,पंकज लवटे ,उमेश वायसे, कुणाल राऊत ,करण सोगे ,आकाश केकान, करण कांबळे ,सुशील वैराळे ,दत्ता तोंडे, यासह आदी विद्यार्थ्यांना वरण-भातातून विषबाधा झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्याकरिता येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी बाबासाहेब उजगरे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते दिनेश मस्के यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी या सर्व मुलांची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
वडवणी शहरांमध्ये सध्या खाजगी वस्तीग्रहांचा सुळसुळाट निर्माण झाला असून यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. पालकांकडून वाटेल तेवढा निधी वसुली करण्याचे काम येथील वस्तीग्रह चालक करत आहेत. यामध्ये कुठल्याही सुख-सुविधा पुरवल्या जात नाहीत, केवळ एक धंदा म्हणून हे वसतिगृहे चालवले जात आहेत. या वस्तीग्रहांना परवानगी देतो कोण , त्याचं नाव काय , कार्यालय कोणतं, काही सुद्धा थांगपत्ता नाही. शिक्षण विभागाकडे याबाबत चौकशी केली असता आम्हाला माहीत नसल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे येथील नगरपंचायत, तहसील कार्यालय, किंवा संबंधित शिक्षण विभागही आम्हास काही माहित नसल्याचे सांगतात. मग यावर नियंत्रण कोणाचे ? वस्तीग्रह चालवण्याची परवानगी कोण देते ? जे देतात ते सदरचे वस्तीग्रह योग्यरीत्या चालतात का ? त्यांना भोजन व्यवस्था व्यवस्थित केली जाते का ? यावर याचा देखील थांगपत्ता नाही. या विषबाधेमुळे मुलांच्या जीविताला धोकाही निर्माण झाला होता. आता मात्र संबंधित शिक्षण विभाग असेल, नगरपंचायत असेल , तहसील कार्यालय असेल, या सर्वांनी वेळीच या बोगस रित्या चाललेल्या वस्तीग्रहांना अचानक भेटी देऊन तेथील माहिती घ्यावी. व सदर चे अनाधिकृतपणे चालणारे वस्तीग्रह बंद करून वडवणी शहरात विविध शिक्षण संस्थेत व जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव वाचवावा अशी हाक दिली जात आहे . दुसरीकडे हेच खाजगी वस्तीग्रह चालक पालकांकडून मोठ्या प्रमाणावर रक्कमा घेऊन मनमानी कारभार करत असल्याचे ही आता उघड झाले आहे.