Home » माझा बीड जिल्हा »  श्री.चैतन्य महाराज देगलूरकर यांची प्रवचनमाला.

 श्री.चैतन्य महाराज देगलूरकर यांची प्रवचनमाला.

 श्री.चैतन्य महाराज देगलूरकर यांची प्रवचनमाला.

अमोल जोशी / डोंगरचा राजा आँनलाईन

– 19 ते 23फेब्रुवारी दरम्यान प्रवचनमाला

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येथील सद्गगुदू श्री धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठाण, बीडच्या वतीने गुरूवर्य ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अमृतवाणीतून दत्त मंदीर, सुभाष रोड, बीड येथे मंगळवार दि.19 ते शनिवार दि.23 फेबु्रवारी 2019 या दरम्यान सायंकाळी ठिक 6.30 ते 08.30 या वेळेत नारदभक्तीसुत्र या विषयावरील प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले असून मागील अनेक वर्षापासून चालू असलेली प्रवचनमाला भाविकात लोकप्रिय असून चैतन्य महाराजाच्या अमृतवाणीतून प्रगट होणारे अनमोल विचार मनात साठविण्यासाठी भाविकांची दर वर्षी गर्दी वाढत आहे.

सद्गुरू ह.भ.प. श्री.चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अमृतवाणीतून मागील काळापासून अखंड चालू असलेल्या नारदभक्तीसुत्र या विषयावरील प्रवचनमालेच्या नियोजनासाठी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रविण इंगळे, ह.भ.प.एकनाथ महाराज पुजारी, राजराजे ठाकूर, रामराजे राक्षसभूवनकर, श्रीनिवास कुलकर्णी, प्रा.मुकूंद देशमुख, मधुकरराव वैद्य , रमेशबुवा जोशी पोहनेरकर, अविनाश पानगांवकर, रमेश रसाळ, जगदीश माळेवाडीकर, संजय देशमुख, दत्तोेपंत विडेकर, अ‍ॅड.प्रदिप देशमुख, सुनिल बेहरे, शरद येवतेकर, उत्तमराव अमलेकर, एन.जी.कुलकर्णी, अनिल चिटगोपेकर, मनोहर देशपांडे, एस.पी.निरंतर, धनंजय गोस्वामी, मकरंद कुलकर्णी, दत्तात्रय तळेकर आदींसह शिष्य परिवार, भाविकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.