आ.धस वाढदिवसानिमित्त सेवाश्रमला अन्नदान .
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन.
– नगरसेवक विजय जोशी यांनी केले अन्नदान.
बीड लातूर उस्मानाबाद विधानपरिषदेचे भाजपा आमदार सुरेश आण्णा धस यांचा आज 2 फेब्रुवारी रोजी वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने पाटोदा नगरपंचायतचे नगरसेवक आमदार सुरेश धस यांचे विश्वासू सहकारी विजय जोशी पत्रकार यांनी आज आण्णाच्या वाढदिवसा निमित्त शिरूर कासार तालुक्यातील ब्रह्मनाथ येळब येथील सेवाश्रमला एक दिवसाच्या अन्नदानाचे पैसे आमदार सुरेश धस यांच्या शुभहस्ते सेवाश्रमचे संचालक श्री सुरेश राजहंस यानां देऊन आण्णा यांचा वाढदिवस साजरा केला.
शिरुरकासार जि बीड तालुक्यातील ब्रम्हनाथ येळंब येथे सेवाश्रम प्रकल्पाच्या माध्यमातुन गेल्या आठ वर्षांपासुन वंचित ऊपेक्षीत अनाथ तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी श्री सुरेश राजहंस व सौ मयुरी राजहंस हे दांपत्य काम करत आहेत शांतीवनच्या प्रेरणेने सुरु असलेल्या या प्रकल्पात सध्य स्थितीत 26 मुले व 10 मुली प्रवेशित आहेत. कुठल्याही शासकिय अनुदानाशिवाय केवळ लोकसहभागातुन हे काम सुरु आहे. या कामी आपला सहयोग व्हावा या हेतूने नगरसेवक विजय जोशी यांनी सुरेश धस यांच्या शुभहस्ते सेवाश्रमचे संचालक सुरेश राजहंस यांना अन्नदान चे पैसे रोख दिले संचालक सुरेश राजहंस यांनी यांनीही आमदार सुरेश धस यांना वाढदिवसाच्या शुभेछा दिल्या यावेळी पत्रकार पोपटराव राऊत हेही उपस्तीथ होते.