Home » माझा बीड जिल्हा » शेटे साहेब मला वाचवा हो…अमर

शेटे साहेब मला वाचवा हो…अमर

शेटे साहेब मला वाचवा हो…अमर

डोंगरचा राजा / आँनलाईन..

नाव :- अमरदीप नवनाथ झोडगे रा.पुसरा ता. वडवणी जि. बीड  वय : 26 वर्ष शिक्षण बी.एस्सी अॅग्री..

मेंदूपर्यंत ताप गेल्याने मेंदूला सुज आली आहे. ‘हारपेस सिमप्लेक्स वायरस’ असा गंभीर स्वरूपाचा आजार अमरला झाला आहे…

अमर ला लहाणपणापासूनच शिक्षणाची आवड माञ घरची परिस्थती हालाकाची असल्याने त्याने वस्तिगृहात राहुन माध्यमिक शिक्षण घेतले. सुट्टीच्या दिवशी हॉटेलवर काम करून शिक्षणाचा खर्च भागवत जाई. घरी आई वडील उसतोड मजुरीचे काम करतात त्यावरच अमरच्या घरच्या मंडळींचा जिवनाचा गाडा चालतो. अमर उच्च शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादला राहाण्यास गेला.ज्या वयात खेळणे बागडण्याचे वय असते.त्या वयात वाटेल ते काम करून शिक्षण घेत राहीला. परिस्थिती अत्यंत नाजुक व हालाकीची असल्याने त्याने  शिक्षण घेण्याची जिद्द सोडली नाही.ऐवढ्या बिकट परिस्थितीत असताना देखील त्याने बी.एस्सी ॲग्री पूर्ण केली. औरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.कमी वयात नौकरी मिळवण्याचे ध्येय मनात ठेऊन तो जिद्द,चिकाटीे व मेहनतीने मोठी स्वप्ने रंगवु लागला. अनेक स्पर्धा परिक्षा दिल्या, नशीबाने साथ दिली नाही.अवघ्या एक दोन मार्कने नौकरीची संधी हुकत गेली.पण गडी कधीच खचला नाही. नारज झाला नाही.आपली गरीब परिस्थिती हे लक्षात ठेवुन पुन्हा जिद्दीने व चिकाटीने 24 तासा पैकी सलग 16 तास आभ्यासात मग्न होऊन अभ्यास केला.वडवणी तालुक्यातील पुसरा गावचा सर्वांचा लाडका अमर साधा, सरळ, स्वभावाचा सर्वांना परिचीत असणारा गावातील लहान थोरांसह,वयोवृध्द माणसासोबत तोंडभरून बोलायचा.आत्ताच काही दिवसापुर्वी नगरमधील नामांकित हॉस्पीटलमध्ये अमरच्या आईच्या किडणीचे आॅपरेशन केले. त्यामध्ये एक किडणी निकामी झाल्याने किडणी काढण्यात आली.याला मोठा खर्च झाला.याआॅपरेशनच्या खर्चाला दोन महिने पुर्ण होतात की नाही तोच अमरला साधी ताप आली होती, तसाच तो यवतमाळ येथे स्पर्धा परिक्षेसाठी ताप असताना देखील यवतमाळला गेला. तापीकडे थोडस दुर्लक्ष केलं परिक्षा देऊन यवतमाळहुन परतल्यानंतर ताप इतका वाढला की तो ताप थेट मेंदुला जाऊन भिडला. यातच अमर चक्कर येऊन जमीनीवर कोसळला.प्रथम त्याच्यावर बीडच्या खाजगी डाँक्टरने उपचार केले.त्यानंतर त्याला औरंगाबादला हलविण्याचा सल्ला दिला.त्याला तात्काळ बीड वरून औरंगाबाद येथील नंदलाल धुत हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी  रवाना करण्यात आले.सदरील रुग्ण अमरदीप नवनाथ झोडगे हा गेली 23 दिवस नंदलाल धुत हाॅस्पीटल औरंगाबाद येथे व्हेन्टीलेटरवर आहे.तो खुपच गंभीर आहे.त्याच्या मेंदूपर्यंत ताप गेल्याने मेंदूला सुज आली आहे. ‘हारपेस सिमप्लेक्स वायरस’ नावाचा गंभीर स्वरूपाचा आजार अमरला झाला. आज 23 दिवस हा नवजवान मुलगा अंथरूणाशी खिळुन पडला आहे. मृत्युशी झुंज देत आहे.हे दृश्य पाहिल्यावर कुणालाही गहिवरून आल्याशिवाय राहणार नाही.अशी नाजुक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेली 23 दिवस अमरच्या आई वडीलाने व्याजाने व उसने पैसे घेऊन दवाखान्याचा खर्च पेलवण्याचा प्रयत्न केला. माञ परिस्थिती हलाकीची असल्याने पैसा आणायाचा कुठुन ? असा प्रश्न आज अमरच्या वडीलांसमोर पडला आहे. तीन लाख रूपायाचा डोस द्यायाचा आहे.खर्च खुपच मोठा असल्याने वडील खचुन गेले आहेत.आज अमरच्या उपचारासाठी पैसे जवळ नसल्याने आई वडील हवालदील झाले आहेत.समाजात व आपल्या महाराष्ट्रात मदत करणारे मोठे हात आहेत. ऐवढी जाण ठेवुन नवजवान अमरला  जेवढी मदत करता येईल तेवढी सढळ हाताने मदत करावी.

महत्त्वाचे म्हणजे…

मुख्यमंत्री आरोग्य साहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे हे अमर साठी धावुन आले…
त्यांनी जराही वेळ न दवडता पुसरा गावचे सरपंच हरी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री साह्यता कक्षा अंतर्गत 1लाख 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली.

Leave a Reply

Your email address will not be published.