Home » माझा बीड जिल्हा » पद्मश्री सय्यद शब्बीर यांचा सत्कार..

पद्मश्री सय्यद शब्बीर यांचा सत्कार..

पद्मश्री सय्यद शब्बीर यांचा सत्कार..

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड दि. 28:- शिरुर तालुक्यातील दहिवंडी या गावातील सय्यद शब्बीर यांना पशुसंवर्धन विभागाचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पद्मश्री सय्यद शब्बीर यांचे सर्व कुटुंब गो-पालनाच्या सेवेसाठी काम करीत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाने त्यांना गो-पालन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.
यावेळी पद्मश्री सय्यद शब्बीर यांनी टंचाई परिस्थितीमध्ये गोशाळेसाठी चारा, पाणी तसेच जनावरांसाठी शेड ची व्यवस्था व्हावी, दहिवंडी येथे चारा छावणी उपलब्ध करुन द्यावी, पोकरा व कृषी योजनांमधून सौरपंप तसेच अन्य वैयक्तिक लाभाच्या योजना मंजूर करून मिळाव्यात, अशा विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्याशी चर्चा केली. श्री.सिंह यांनीही पद्मश्री श्री.सय्यद यांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवित संबंधितांनी ही कामे तात्काळ मार्गी लावावीत, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिरुर तहसिलदार प्रिया मुळे,नायब तहसिलदार सय्यद कलीम, तुळशीराम आर्सुळ यांच्यासह अन्य अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.