Home » माझी वडवणी » माजलगांव जलाशयात जलसमाधी घेणार..?

माजलगांव जलाशयात जलसमाधी घेणार..?

माजलगांव जलाशयात जलसमाधी घेणार..?

डोंगरचा राजा / आँनलाईन..

माजलगाव जलाशयाच्या मासेमारीच्या तलाव ठेका परमेश्वर किसन अंडील यांना देण्यात आलेला आहे .हा एका ठेकेदाराने बेकायदेशीरपणे उपठेक्याणे चालवण्यासाठी अर्जुन नाईकनवरे ,उद्धव नाईकनवरे यांना दिलेला आहे. सदरील ठेकेदार स्थानिक व पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांवर खोटे चोरीचे गुन्हे दाखल करीत आहेत. शासन निर्णय व तलाठी कार्यालय आदेशा मध्ये अट क्रमांक 7 मध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की सदर तलावाचा दुसऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेस लिलावाने अथवा खाजगी कराराने कोणत्याही उद्देशाने दुसऱ्या मक्तेदारास ठेक्याने देता येणार नाही. तरी देखील बेकायदेशीरपणे राजरोस हा ठेकेदार माजलगाव जलाशयाचा मासेमारीचा तलाव ठेका चालूवित आहेत. या ठेकेदाराशी संगनमत करून मत्स्य विभाग देखील ठेकेदाराची पाठराखण करत आहे.
माजलगाव जलाशयातील या सर्व मच्छीमारांनी विविध कार्यालयात अनेक निवेदने व अर्ज केलेले आहेत. परंतु आजपर्यंत या कार्यालयाने ठेकेदार विरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. संपूर्ण बीड जिल्ह्याला मच्छीमारांवर होत असलेल्या अत्याचाराची व अन्यायाची जाणीव आहे. यापूर्वी देखील मच्छीमारांनी आंदोलने उपोषणे केलेली आहेत.परंतु आता ठेकेदार व स्थानिक मच्छीमार यांच्यात खूप वाद निर्माण झाला आहे. तो वाद दिवसेदिवस वाढत चाललेला आहे. तत्कालीन कलेक्टर केंद्रेकर यांनी देखील मच्छीमारांवर ठेकेदाराकडून होत असलेल्या अन्यायाविषयी सन 2014 मध्ये मत्स्य आयुक्त मुंबई यांना पत्र पाठवले होते. त्याची प्रत सोबत दिली आहे. तरीदेखील आमच्या मागण्या मान्य व पूर्ण न झाल्यास नाविलाजास्तव आम्ही माजलगाव जलाशयात सर्व स्थानिक मच्छीमार 26 जानेवारी 2019 रोजी दुपारी बारा वाजता ठिकाण माजलगाव जलाशयावरील देवगाव तालुका वडवणी जिल्हा बीड याठिकाणी माजलगाव जलाशयात जलसमाधी घेणार आहोत. याची सर्व जबाबदारी आपल्या प्रशासन व सरकारवर राहील याची नोंद घेण्यात यावी. अशी मागणी भोई समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली असून त्यांच्या इतरही काही मागण्या खालील प्रमाणे आहेत. माजलगाव जलाशयाचा सन 2015 ते 2020 पर्यंत मासेमारी तालावर ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा. मच्छिमारांवर अन्याय करणाऱ्या ठेकेदार परमेश्वर व उपठेकेदार अर्जुन नाईकनवरे,उध्दव नाईकनवरे यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. मच्छीमारांवर करण्यात आलेल्या खोट्या पोलीस केसेस रद्द कराव्यात व संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. माजलगाव जलाशयावर बेकायदेशीरपणे आलेल्या परप्रांतीय मच्छीमार यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
या मागण्याचे निवेदन भोई समाज संघटनेच्या वतीने भिमा गहिरे,सतीश लुचारे ,बंडू बनगे ,बाळू गहिरे, नितीन लुचारे, दीपक लुचारे, भागवत कचरे, गोरख लुचारे ,छत्रगुन लुचारे, नामदेव लुचारे ,सोनाजी लुचारे ,राहुल लुचारे,
मच्छिंद्र बनगे, पांडुरंग गहिरे ,सतीश धनुरे ,लहू कचरे ,भगवान लुचारे, गणेश परसे, पांडुरंग इंद्रुके ,खंडु गिरुटे,सुनील कुंडरे ,बालासाहेब कचरे ,विकास घुंगासे ,गुलाब परसे ,नवनाथ तुंबारे ,सुनील धनुरे ,सचिन घुंगासे ,मुंजा इंद्रुके सह आदींनी मुख्यमंत्री पालकमंत्री पोलीस अधीक्षक मस्त आयुक्त उपप्रादेशिक आयुक्त साहेब आयुक्त उपविभागीय अधिकारी तहसीलदार प्रधान सचिव उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक वडवणी यांना देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.