Home » महाराष्ट्र माझा » भाग्यश्रीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या.

भाग्यश्रीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या.

भाग्यश्रीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या.

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

– नाभिक समाजाला ऍट्रासिटी कायदा लागू करा.

— सकल नाभिक समाजबांधवाकडून पाटोदा तहसीलदार यांना निवेदन

पाटोदा– सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी (करपेवाडी) येथील नाभिक समाजातील १२ वी ची विद्यार्थीनी भाग्यश्री (सोनाली) संतोष माने हिची गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

स्व.भाग्यश्री माने या नाभिक समाजातील मुलीच्या हत्येप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना न्यायालयात हजर करून फाशीची शिक्षा दिली पाहिजे तोपर्यंत नाभिक समाज स्वस्थ बसणार नाही.
दिवसेंदिवस नाभिक समाजावर अन्याय वाढतच चालले आहेत यामुळे या समाजाला अॅट्रॉसिटीचा कायदा महाराष्ट्र सरकारने लागू केला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
कारण असा कायदा कर्नाटक सरकारने केलेला आहे मग महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.
हातगाव कांबी (अहमदनगर) चे प्रकरण ताजे असताना हा नाभिक समाजावर होणारा दुसरा भ्याड हल्ला आहे.
मुख्यमंत्री यांनी याची वेळीच दखल घ्यावी नसता महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या अमानवीय कृत्याचा निषेध करण्यासाठी आणि आरोपीस लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज तहसील कार्यालय पाटोदा येथे तहसीलदार यांना सकल नाभिक समाज पाटोदा यांनी निवेदन दिले.
यावेळी शहर व तालुक्यातील नाभिक समाजबांधव यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.