दिलीप देशमुखसर, आम्हाला आपला अभिमान आहे…
डोंगरचा राजा / आँनलाईन
बीड जिल्हयाचे भूमीपूत्र दिलीप देशमुख यांनी पुणे विभागीय सह धमॅदाय आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून शिक्षण संस्थांतील भ्रष्टाचार, अनागोंदीला चाप लावण्याचा प्रयत्न केला आहे.. देवस्थानच्या विश्वसथांची मनमानीवरही त्यांनी अंकुश लावला आहे.. वादग्रस्त आणि बजबजपुरीनं ग्रस्त अशा काही देवस्थानाला देखील सरळ करण्याचा धडाका दिलीप देशमुख यांनी लावला आहे. त्यामुळं विविध सार्वजनिक संस्थांचा स्वार्थासाठी वापर करणारया संस्था चालकांमधये घबराट पसरली आहे..
सिंहगड इन्स्टिटय़ूट आणि या संस्थेचे चेअरमन डॉ. एम. एन. नवले हे पुण्यातील मोठं प्रस्थ.. शिक्षण संस्थेच्या नावाखाली त्यांनी पुण्यात दुकानदारी सुरू केली.. . गोर गरिबांच्या मुलांकडून वारेमाप डोनेशन घेऊन त्यांनी शिक्षणाचा बाजार मांडला होता. त्याचबरोबर कमॅचारयांचे वेतन न देणे, मनमानी पध्दतीने प्राध्यापकांना कामावरून काढून टाकणे, शासनाकडून प्राप्त होणारया शिष्यवृत्तीचा गैरवापर करणे आदि तक्रारी नवले यांच्या विरोधात होत्या. एका प्रकरणात त्यांना शिक्षा झाली होती ते तुरूंगवासही भोगून आले होते.. एवढं सारं होऊन देखील राजकीय नेत्यांचं अभय असल्याने त्यांचा वारू उधाळलेलाच होता..
पुणे विभागीय सह धमॅदाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी सोमवारी या वारूला लगाम लावला.. एका प्रकरणात निर्णय देताना दिलीप देशमुख यांनी सिंहगडचे अध्यक्ष डॉ. एम. एन. नवले यांचे विश्वस्तपद आणि संस्थेचे अध्यक्षपद रद्द करण्याचा महत्वपूर्ण निकाल सोमवारी दिला आहे.. त्यामुळं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.. या निर्णयाचे शिक्षण प़ेमी जनतेनं स्वागत केले आहे. डॉ. नवले यांना 4 फेब्रुवारी पयॅंत उच्च न्यायालयात अपिल करण्याची मुदत दिली गेली आहे.. एखाद्या शिक्षण संस्थेच्या विश्वस्तास शिक्षा झाली असेल आणि त्याने तुरूंगवासही भोगला असेल तर अशा विश्वस्तांना विश्वस्त पदावरून काढून टाकण्याचा अधिकार धमॅदाय आयुक्तांना असतो.. या नियमाचा आधार घेत ही कारवाई करण्यात आली..
बीड जिल्हयाचे अनेक सुपूत्र विविध वरिष्ठ शासकीय पदावर कायॅरत असून ते प्रामाणिकपणे, कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करीत सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत, आपल्या जिल्हयाचे नाव रोषण करीत आहेत.. तुकाराम मुंडे, दिलीप देशमुख ही त्याची काही उदाहरणे आहेत..
दिलीप देशमुखसर यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे..