Home » माझा बीड जिल्हा » कु.आरती खाकरे जिल्ह्यात प्रथम..

कु.आरती खाकरे जिल्ह्यात प्रथम..

कु.आरती खाकरे जिल्ह्यात प्रथम..

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

पाटोदा- आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन बीड यांचे तर्फे डिसेंबर महिन्यात जिल्हास्तरीय भगवदगिता प्रज्ञाशोध परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल दि.१९ /०१ /२०१९ रोजी जाहीर झाला. पाटोदा येथील भामेश्र्वर विद्यालयाची विद्यार्थीनी कु.आरती संतोष खाकरे हिने या परिक्षेत जिल्ह्यात सर्व प्रथम येण्याचा सन्मान मिळवला आहे.
हि परिक्षा दोन गटात घेण्यात आली होती.१) ८ वी ते १० वी २)५ वी ते ७ वी कु.आरती खाकरे हि ८ वी ते १० वी या गटात ज़िल्ल्यात सर्वप्रथम आली आहे. या स्पर्धेत जिल्हाभरातील जवळजवळ ४० शाळांनी सहभाग घेतला होता. सदर परिक्षेचा ऊददेश भगवदगिते बद्दल आस्था, आवड व ज्ञानजिज्ञानासा निर्माण व्हावी या हेतूने इस्कॉन तर्फे हि परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचे बक्षिस वितरण बीड येथील इस्कॉन मंदिर येथे झाले. या कार्यक्रमासाठी आफ्रीके कडून आलेली राम गोविंद स्वामी व माॅरिशस येथून सुंदरलाल प्रभू यांचे असे प्रथम आलेल्या कु.आरती खाकरे हिस रोख ५.००० रु.तसेच स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. तिच्या या यशाबद्दल पालकवर्ग, मुख्यध्यापक, शिक्षकवृंद, विद़यार्थी व पाटोदा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक व अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.