ॲड.कवठेकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन
पाटोदा — गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैचारिक परिर्वनासाठी काम करणारे जि.प.सदस्य ॲड.प्रकाश कवठेकर यांना दि.१२ जानेवारी जिजाऊ जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ समाज भूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
राष्ट्रमाता जिजाऊ समाज प्रबोधन मंडळ, जिजाऊ जन्मोत्सव संयोजन समिती वानगाव फाटा, मराठा कृती गटच्या वतीने ॲड.प्रकाश कवठेकर यांना राजमाता जिजाऊ समाज भूषण पुरस्कार जाहिर करण्यात आला होता. या पुरस्काराचे दि.१२ जानेवारी रोजी वानगाव फाटा येथे आयोजीत जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात सन्मानीत करण्यात आले. यावेळी व्याख्याते प्रविण गायकवाड,ॲड.जगन्नाथ औटे, प्राचार्य पा.बा.सावंत, हरिश्चंद्र चव्हाण, दिगांबर जाधव, प्रा.पी.वाय.जोगदंड, संतोष डोंगरे, विनोद चव्हाण आदि उपस्थित होते.