Home » ब्रेकिंग न्यूज » वार्षिक संजीवन समाधी महोत्सव..

वार्षिक संजीवन समाधी महोत्सव..

वार्षिक संजीवन समाधी महोत्सव

अमोल जोशी डोंगरचा राजा ऑनलाईन

वार्षिक संजीवन समाधी महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताहास 21 जानेवारी पासून होणार सुरुवात . श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमाची जय्यत तयारी

मुखेड येथील परमपूज्य सद्गुरू नराशाम महाराज मठ संस्थान आहे. या संस्थानात प्रतिवर्षी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी वार्षिक संजीवनी समाधी काल महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह व दिव्य स्वरुपात श्रीमद् भागवत कथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह दिनांक 21 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे.या सप्ताहात नित्य रोज समाधी रुद्राभिषेक, नाम जप,अनुष्ठान, गुरुचरित्र पारायण, श्री नराशाम स्तोत्र, श्री ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, श्रीमद् भागवत कथा, हरिपाठ, हरि कीर्तन, हरिजागर आदी भरगच्च कार्यक्रम नियमित होणार आहेत. श्री भागवताचार्य ह. भ. प. अनंत महाराज बेलगावकर हे भागवत कथा सांगणार आहेत. या सप्ताहात ह-भ-प गोरख महाराज रायते पंढरपूर, ह-भ-प पुष्कर महाराज गोसावी, श्री संत एकनाथ संस्थान पैठण, राजेश महाराज गुंजर्गेकर परमपूज्य सद्गुरू नराशाम महाराज, ह-भ-प महादेव महाराज बोराडे शास्त्री, श्री तुकोबाराय पावन धाम संस्थान आंबेजोगाई, श्री ह भ प गोविंद महाराज गोरे, आळंदी पुणे, श्री ह भ प विनोदाचार्य बाबा महाराज इंगळे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.हृदयरोग निदान शिबिर व आयुर्वेदिक शिबिराचे आयोजन गुरुवारी दिनांक 24 रोजी करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवारी दिनांक 5 रोजी सकाळी 10 ते 1 वाजता आयोजित केले आहे. तसेच सन्मान सैनिकाचा कार्यक्रम शुक्रवारी दिनांक 25 रोजी सायंकाळी 5 ते 7 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.राहेर, हिप्परगा, खतगाव, चिखली, हळदा, वसूर, हसनाळ, डोंगरगाव, कुंचोली, बावलगाव येथील पायी दिंडीचे आगमन येवती येथे शनिवारी दिनांक 26 रोजी होणार आहे.श्री ज्ञानेश्वरी सांगता, गाथा पूजन, संजीवनी समाधी महाभिषेक, महाआरती, श्रीमद् भागवत कथेची सांगता व महाप्रसादाचा कार्यक्रम रविवारी दिनांक 27 रोजी श्री सद्गुरू नराशाम महाराज मठ संस्थान येथे आयोजित करण्यात आला आहे. श्रीक्षेत्र येवती येथील सद्गुरू नराशाम महाराज मठ संस्थान येथे आयोजित वार्षिक संजीवनी समाधी काल महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह व दिव्य स्वरुपात श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री सद्गुरू नराशाम महाराज मठ संस्थानच्या वतीने श्री बाळु महाराज जोशी येवतीकर व येवती ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.