Home » विशेष लेख » पुण्यतिथी महोत्सवास उद्यापासून..

पुण्यतिथी महोत्सवास उद्यापासून..

पुण्यतिथी महोत्सवास उद्यापासून..

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

सद्गुरू श्री.धुंडा महाराज देगलूरकर व मातोश्री कृष्णामाई यांच्या 27 व्या पुण्यतिथी महोत्सवास उद्यापासून पंढरपुरात होणार सुरुवात

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सद्गुरू श्री धुंडा महाराज देगलूरकर पुण्यतिथी महोत्सव समिती,पंढरपुरच्या वतीने वारकरी शिक्षण संस्था प्रदक्षिणा मार्ग, पंढरपुर येथे पौष शु.13 शनिवार दि. 19 ते पौष व.6 शनिवार दि. 26 जानेवारी 2019 दरम्यान सद्गुरू श्री धुंडा महाराज देगलूरकर पुण्यतिथी महोत्सव विविध धार्मीक कार्यक्रमाने संपन्न होत असून या महोत्सवात नियमीत काकडा, श्रीज्ञानेश्‍वरी प्रवचन, ह.भ.प. रामचंद्र महाराज बोधे यांच्या मार्गदर्शनाखाली गाथा भजन तर ह.भ.प. दिलीप महाराज देवडीकर यांच्या संयोजन लाभणार असून सप्ताह दरम्यान हरिपाठ तसेच नामवंत प्रवचनकारांची प्रवचन सेवा, किर्तनकारांची किर्तन सेवा लाभणार असून महोत्सवास भाविकभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या महोत्सवात सकाळी ठिक 10 ते 11 या प्रवचन,सत्रात ह.भ.प. आशुतोष महाराज बडवे, बासुदेव महाराज कोलंबीकर, केशव महाराज मुळीक, उमेश महाराज दशरथे, तुकाराम महाराज मुळीक, अक्षय महाराज भोसले तर सायंकाळ ठिक 05 ते 06 दरम्यानच्या प्रवचन सत्रात ह.भ.प. बाळशास्त्री हरिदास, सोपानकाका पहाणे, भागवत महाराज साळुंके, माऊली महाराज कदम, अनिरूध्द महाराज जोशी, शिवाजी महाराज काळे, वा.ना .उत्पात यांची प्रवचन सेवा संपन्न होणार असून नियमीत रात्री ठिक 07 ते 09 दरम्यान ह.भ.प.शंकर महाराज बडवे, देवराम महाराज गायकवाड, पुरूषोत्तम महाराज पाटील, जयवंत महाराज बोधले, प्रमोद महाराज जगताप, पांडुरंग महाराज घुले, संदीपान महाराज हसेगांवकर यांची किर्तन सेवा संपन्न होणार असून पुण्यतिथी महोत्सवाचा मुख्य दिवस पौष वद्य 5 शुक्रवार दि. 25 जानेवारी रोजी धार्मीक विधी व नगर प्रदक्षिणा संपन्न होणार असून पौष व. 6 शनिवार दि. 26 जानेवारी सकाळी ठिक 09 ते 11 या दरम्यान गुरूवर्य ह.भ.प.श्री.चैतन्य भानुदास महाराज देगलूरकर यांचे काल्याचे किर्तन होणार असून या महोत्सवास भाविकभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तीं आनंद घ्यावा असे आवाहन सद्गुरू श्री.धुंडा महाराज देगलूरकर सेवा समिती वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.