अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन
पाटोदा — आनंदऋषिजी नेत्रालय, अहमदनगर ,रोटरी क्लब ऑफ़ पाटोदा व आनंद क्लॉथ सेंटर पाटोदा संयुक्त विद्यमाने रविवार *दि.20 जानेवारी 2019रोजी* सकाळी 10 ते 2 या वेळेत *नगरपंचायत कॉमप्लेक्स पाटोदा* येथे *15 वे मोफत डोळे तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर* आयोजित केले आहे. शिबिरामध्ये ज्या रुग्णाना मोतीबिंदू वा पडदा असेल त्यांना शस्त्रक्रियेसाठी त्याच दिवशी अहमदनगर ला नेण्यात येईल. गरजू रुग्णानी येताना आधार कार्ड व घरचा फ़ोन नंबर आणणे गरजेचे आहे. रुग्णांना यासाठी भारतीय भिंग 700 रु., उच्च दर्जाचे भारतीय भिंग 2200 रु., तसेच लेसर(फेको)पध्दतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया 5000रु., पडदा शस्त्रक्रिया 2300 रु. असे नाममात्र शुल्क भरावे लागेल. यामध्ये रुग्णांना पाटोदा ते नगर व परत नगर ते पाटोदा , दोन दिवस राहने,जेवन तसेच काळा चष्मा ,एक महिन्याची औषधं दिली जातात. सामाजिक जाणिवेच्या भावनेतून आनंदऋषिजी नेत्रालयाणे ” *आनंद दृष्टीभेट”* हा प्रकल्प एक वर्षापासून राबवला असुन बीड,उस्मानाबाद व अहमदनगर या तिन जिल्ह्यांत 9000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. डोळ्यांच्या तपासणी साठी जागतिक दर्जाची उपकरणे, 8 प्रशिक्षित व अनुभवी डॉक्टर, जागतिक दर्जाची 3 ऑपरेशन थियटर, विस्तिर्ण व प्रशस्त जागा, तसेच नम्रतेने सेवा देणारे कर्मचारी अशी आमची वैशिष्टये आहेत.रोटरी क्लब ऑफ़ पाटोदा मागील एक वर्षापासून हे शिबिर घेत असुन पाटोदा परिसरातील 600 रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.सामाजिक कार्यात रोटरी सदैव अग्रेसर राहते व विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेतात . दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हे शिबिर घेण्यात येते. तरी या शिबिराचा लाभ सर्व गरजु रुग्णानी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ़ पाटोदा व आनंदऋषिजी नेत्रालयच्या वतिने करण्यात आले आहे.