ओबीसी मोर्चास बहुसंख्येने उपस्थित रहा – राऊत
डोंगरचा राजा / आँनलाईन
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड जिल्हा आयोजित ओबीसी मोर्चात शामील होण्याचे आवाहन विभागीय अध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांनी माजलगाव येथिल विश्राम ग्रहात आयोजित बैठकीत केले आहे.
ओबीसी व इतर विद्यार्थ्यांच्या मागील तीन वर्षाची थकीत शिष्यवृत्ती तात्काळ मिळणे, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मेडिकल इंजिनिअरिंग व व्यवसायिक शिक्षणात एस.सी, एस.टी.प्रमाणे शंभर टक्के शुल्क परतावा मिळणे आदीसह ओबीसी समाजावर होणारे अन्याय दूर करण्यासाठी येत्या 21 जानेवारी रोजी मल्टीपर्पज मैदान छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मोर्चाचं आयोजन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ने केले आहे.त्यानिमित्त बैठकीचे आयोजन माजलगाव येथील शासकीय विश्रामगृहात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बळीराम ढगे यांनी केले होते.
या बैठकीस माजलगाव तालुक्यातील ओबीसी समाज बहुसंख्येने उपस्थित होता.
या बैठकीत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड जिल्हा संघटकपदी अनिल कटारे, दशरथ राऊत यांची जिल्हा संघटक , रमेश रासवे यांची जिल्हा सचिव व माजलगाव सोशल मीडिया तालुकाध्यक्षपदी श्याम कटारे, तालुका संघटक अमोल जाधव यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य शरद चव्हाण. माजी पं.स.सभापती दिनेश गायकवाड,शिवप्रसाद खेञी,अजय शिंदे, गणेश कासवे,अशोक ढगे, राजाभाऊ कटारे,संतोष स्वामी, विशाल जाधव,बाबा राऊत रामेश्वर कोरडे सह समता परिषदेचे सदस्य उपस्थित होते.