Home » माझा बीड जिल्हा » आ.जयदत्त क्षिरसागर यांची लक्षवेधी..

आ.जयदत्त क्षिरसागर यांची लक्षवेधी..

आ.जयदत्त क्षिरसागर यांची लक्षवेधी..

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. आ. जयदत्त क्षीरसागर यांनी या बैठकीत जनहिताचे विविध मुद्दे उपस्थित करून प्रशासनास विविध सूचना दिल्या. खालील मुद्दे आ. क्षीरसागर यांनी बैठकीत उपस्थित केले.

१. दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने पाण्याचे टँकर मागणी केल्यानंतर तात्काळ उपलब्ध झाले पाहिजे.

२. जनावरांना चारा आणि पाणी याबाबत प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली व्हायला हव्या. जनावरांना चारा आणि पाण्याची व्यवस्था युद्धपातळीवर करण्यात यावी.

३. सौभाग्य योजनेअंतर्गत वीज कनेक्शन तातडीने द्या.

४. अंगणवाडी इमारत बांधणी व अन्य बाबींसाठी उपलब्ध निधीचा वापर करावा.

५. नगर परिषदांना विविध विकास कामांना निधी वाढून देण्याकरीता तरतूद तातडीने करावी.

६. हागणदारी मुक्ती अभियानासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा.

७. मागील २ वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाहीये. ओबीसी विद्यार्थी व आर्थिक दृष्टया मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याने अनेकांना आता परीक्षा शुल्क भरण्याची देखील परिस्थिती नाहीये. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता यंदा विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क सक्ती करू नये.

८. बीड तालुका संकुलासाठी तातडीने टेंडर काढावे व काम लवकरात लवकर सुरु करावे.

९. जलयुक्त शिवार कामात ग्रामपंचयतींचे ठराव असणे बंधनकारक आहे. मात्र अधिकारी व ग्रामपंचायत यांच्या सुसूत्रता नसल्यामुळे जलयुक्त शिवारची कामे चुकीच्या पद्धतीने होत आहे.

१०. अंथरवन पिंप्री येथे संसर्गजन्य आजाराने लसीकरनाभावी जनावरे दगावल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणाची चौकशी करून यापुढे याप्रकारचा निष्काळजीपणा होणार नाही यासाठी जिल्हा पातळीवर दक्षता घ्यावी.

संबंधित कुटुंबियांना आम्ही आमच्या पातळीवर आर्थिक मदत करणार आहोत. शासनाने देखील तातडीने मदत करावी.

११. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य पाहता स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून प्रत्येकी १० किलो तांदूळ व १५ किलो गहू  सरसकट सर्वांना उपलब्ध करून देण्यात यावा.

१२. बीड, गेवराई व माजलगाव तालुक्यासाठी तातडीने किमान ३ टी एम सी पाणी सोडण्यात यावे.

Leave a Reply

Your email address will not be published.